Wonder Drinks Mixture | रोज प्या दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक, आयुष्यासाठी वरदानपेक्षा नाही कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Wonder Drinks Mixture | रात्री जेवल्यावर काय करावे हे अनेकांना समजत नाही. अशावेळी फिरल्यानंतर अनेकजण झोपतात. आज आपण अशा ड्रिंकबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्यायल्यानंतर झोप सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू तीक्ष्ण होऊ लागतो (Wonder Drinks Mixture). दूध, बडीशेप आणि खडीसाखर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयर्न भरपूर असते. दूध कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. या तिन्ही पदार्थांचे ड्रिंक पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात (Drink Saunf & Mishri)…

 

स्ट्रेससाठी प्रभावी
दिवसभर कामाची चिंता, तणाव वाढू लागतो, त्यामुळे डोकेदुखी सुरू होते. अशावेळी, बडीशेप आणि खडीसाखर मिसळून दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हे ड्रिंक प्यायल्याने मन शांत राहते आणि स्ट्रेस हार्मोन्स तणाव निर्माण होऊ देत नाहीत.

 

पोटाच्या समस्येपासून होईल सुटका
आजकाल लोकांना बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास जास्त होतो. यासाठी चांगल्या खाण्या-पिण्यासोबतच असे काही ड्रिंक प्यावे, ज्यामुळे पोटाचा त्रास होणार नाही, अशावेळी खडीसाखर आणि बडीशेप मिसळून दूध प्यावे, हा एक चांगला पर्याय आहे. बडीशेपमध्ये एस्ट्रेंजेल आणि अ‍ॅनेथोल गुणधर्म असल्यामुळे ती जुनाट बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. (Wonder Drinks Mixture)

त्वचेसाठी फायदेशीर
पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतात, त्यासाठी महागड्या क्रिमचा वापर केला जातो. जर तुम्हाला नेहमी त्वचेची अ‍ॅलर्जी आणि मुरुमांची समस्या होत असेल तर अशावेळी दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक प्यावे, कारण बडीशेपमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

 

डोळ्यांच्या समस्येपासून सुटका
दिवसभर कॉम्प्युटर किंवा मोबाईलसमोर काम केल्याने डोळ्यांवर खोलवर परिणाम होतो.
दूध, बडीशेप आणि खडीसाखर पिऊन डोळ्यांवरील हे परिणाम कमी करता येतात.
कारण बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, ज्यामुळे दृष्टी स्वच्छ राहण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Wonder Drinks Mixture | drink milk saunf and mishri it will boost your power and make strong your bone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pre-Diabetes Diet | डायबिटीजचा धोका वाटतोय का? बचावासाठी खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Skin Treatment | पायांची शायनिंग वाढवण्याची आश्चर्यकारक पद्धत, घरीच घालवा’ हे’ काळे डाग

 

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरची जोखीम वाढवतात रात्री केलेल्या ‘या’ चूका, अवयव होऊ शकतात खराब !