आश्चर्यम …! केंद्रीय मंत्री म्हणतात विजय माल्ल्यासारखे स्मार्ट बना

हैदराबाद: वृत्तसंस्था
भारतीय बँकांना चुना लावून उद्योगपती विजय माल्या परदेशात पळून गेला आहे. त्याला भारतीय  पोलीस पकडण्याच्या पयत्नात असताना. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी चक्क विजय माल्ल्याचा आदर्श घ्या असे वक्तव्य केले आहे. त्यांनी आदिवासी समाजातील तरुण उद्योजकांना विजय माल्याच्या आदर्शाचा अजब सल्ला दिला आहे. “केवळ हार्ड वर्कर बनू नका; फरार उद्योगपती विजय माल्लयासारखं स्मार्ट बना,’ असा सल्ला जुएल ओराम यांनी दिल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे”.
[amazon_link asins=’B01C8MCPQ4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57548d11-8737-11e8-844a-ede697aeafe3′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  हैद्राबाद येथे पहिल्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती संमेलनाला जुएल ओराम  यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी  संमेलनाला संबोधित हा सल्ला दिला. ते म्हणाले , “चुकीची कामं करण्यापूर्वी विजय मल्ल्याने उद्योग क्षेत्रात यश मिळविले होते. त्याने त्याचा उद्योग स्थिरस्थावर केला होता. त्यामुळे त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी”,असे ओराम म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ”तुम्ही विजय मल्ल्याला शिव्या देता. पण मल्ल्या कोण आहे? तो एक स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने बुद्धिमान लोकांना कामावर ठेवले आणि बँका, राजकारणी आणि सरकारला आपल्या कामाने प्रभावीत केले. असे करण्यापासून तुम्हाला कोण रोखतं? व्यवस्थेवर प्रभाव पाडण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवलेलं  नाही,’ असंही ते म्हणाले. आदिवासींनी आरक्षणाचा फायदा घेत शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी आदिवासी समाजातील एक हजाराहून अधिक उद्योगपती उपस्थित होते.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6530d41a-8737-11e8-bd49-550a6c540605′]
सध्या विजय माल्या ब्रिटनमध्ये आहे त्याला तेथून भारतात परत  आणण्याकरिता लंडन येथील न्यायालयात खटला सुरु आहे. पण केंद्रीय मंत्र्यांनीच अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आठ्या उमटल्या आहेत.