CAA : माहिती न घेता कायद्याबाबत काहीही टिप्पणी करणं बरोबर नाही, विराट कोहलीनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए बाबत देशात सुरु असलेला गोंधळ सध्या मोठ्या प्रमाणावर शांत झाला आहे. थोड्या फार प्रमाणावर देशाच्या काही भागातील नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करताहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील याबाबत भाष्य केले आहे. सीएए कायद्याबाबत तुम्हाला काय वाटते असे विराटला विचारले असता, याबाबत कोणतेही विधान करण्यास विराटने नकार दिला. माहिती न घेता यावर भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे विराटने यावेळी सांगितले.

आसाममधील गोहाटीमध्ये भारत श्रीलंका टी – 20 सामना खेळला जाणार आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विराट म्हणाला, या कायद्याबाबत माहिती घेतल्याशिवाय त्यावर काही टिपण्णी करणे योग्य होणार नाही. तसेच गोहाटीमध्ये प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची समस्या जाणवली नाही.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गोहाटी पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्हाला या ठिकाणी पोहचण्यासाठी कोणतीही अडचण आली नसल्याचे देखील विराटने यावेळी सांगितले. सीएए बाबत माहिती न घेता त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, पूर्ण माहिती असलेल्यानेच याबाबत आपले मत प्रकट केले पाहिजे असे देखील विराट यावेळी म्हणाला.

मला माहिती नसलेल्या अशा कोणत्याही गोष्टींमध्ये उगाच मला अडकून पडायचे नाही असे देखील विराटने स्पष्ट केले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामान्यांच्या टी – 20 मालिकेतील पहिला सामना 5 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/