‘कोरोना’पासून बचाव ! बिहारमध्ये निवडणूकीत छडीनं EVM चं बटण दाबतील मतदार, खादीचा मास्क मिळणार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन  – बिहार निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणार्‍या मतदारांवर लाकडाची छडी, खादीच्या मास्कचा प्रयोग केला जाणार आहे. या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. ही माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एचआर श्रीनिवास यांनी दिली. बिहार राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी म्हटले की, या वर्षाच्या शेवटी होणार्‍या निवडणुकीत कोरोना व्हायरसचे रूग्ण आणि ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना घरूनच मत टाकणे किंवा पोस्टल बॅलेटच्या वापराची परवानगी असेल.

श्रीनिवास यांनी सांगितले की, ज्या लोकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जायचे असेल, त्यांना कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी छोटी लाकडी छडी देण्यात येईल, ज्याद्वारे ते ईव्हीएमचे बटन दाबू शकतील. जर एखाद्या मतदाराने मास्क घातला नसेल तर त्यास मोफत थ्री-प्लाय खादी मास्क निवडणूक आयोगाकडून देण्यात येईल. हात धुण्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात येईल. बॅक्टेरिया प्रतिबंधक हँडग्लोव्हज सुद्धा उपलब्ध केले जातील.

बिहार निवडणुकीसाठी 45% नवे बूथ

सामाजिक अंतर लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी एकावेळी एका मतदान केंद्रावर 1000 लोकांना जाण्याची परवानगी देण्याच्या पद्धतीवर काम करत आहेत. श्रीनिवास यांनी म्हटले की, बिहारमध्ये 45% नवीन पोलिंग बूथ बनवण्यात येतील, ज्यांना मतदार यादीच्या आधारावर अंतिम रूप देण्यात येईल आणि हे ठरवण्यात येईल की प्रत्येक 1000 लोकांसाठी किमान एक बूथ असेल.

या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्या 32 ते 39 वर्षांचे 1.98 कोटी मतदार आहेत आणि 70 च्या वरील वयाचे 8.70 लाख मतदार आहेत. श्रीनिवास यांनी म्हटले की, सुमारे 7.43 लाख नवीन मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. ऑनलाइन मतदानाच्या शक्यतेवर श्रीनिवास यांनी म्हटले की, यावर निवडणूक अयोग निर्णय घेईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like