सुनेने केला प्रताप ; पोलिसाकडून सुने सह मित्राला अटक

फिल्लौर : वृत्तसंस्था – फिल्लौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठित घराण्याच्या एका सुनेने असा प्रताप केला की वाचून तुम्ही सुद्धा कपाळावर हात माराल. फिल्लौरमधील मुख्य बाजारात कॉस्मेटिकची दुकान असलेल्या इंद्रजीत शर्मा यांच्या घरात मोठी चोरी झाली. यामध्ये १५ लाख रुपयांची रोख आणि २५ तोळे सोने लंपास करण्यात आले. प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर खरा प्रकार उघड झाला. या घरातील सुनेनेच आपल्या फेसबुक मित्राच्या मदतीने सासरच्या संपत्तीवर डल्ला मारला. धक्कादायक म्हणजे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेने हा प्रकार केला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, इंद्रजीत शर्मा यांच्या मुलाचे लग्न सप्टेंबर २०१८ मध्येच झाले होते. त्याचे वडील आणि तो दुकानात गेला होता. तसेच त्याची आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती. जेव्हा राकेश हा दुकानातून घरी गेला तेव्हा कपाटातील पैसे आणि दागिने गायब असल्याचे लक्षात आले. यावेळी इंद्रजीत शर्मा यांनी सुनेला याबाबत विचारले असता तिने माहित नसल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. तपासामध्ये घराच्या गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे दिसले. या कॅमेऱ्याच्या रेकॉर्डिंगमध्ये इंद्रजीत शर्मा यांची सून एका युवकाला बॅग देत असल्याचे आणि परत घरात जात असल्याचे दिसले. यावरून तिच्याकडे संशयाची सुई वळली. यानंतर पोलिसांनी तिच्या या फेसबुक मित्रालाही ताब्यात घेतले.
तीन महिन्यांत फेसबूकवरून सूत जुळले…
तपासामध्ये फेसबुकवर मैत्री झालेल्या या युवकाबरोबर नंतर ही सून फोनवरही बोलायला लागली होती. दिवसभर घरात कोणी नसल्याचे समजल्यावर हा युवक तिच्या घरीही येऊ लागला होता. पोलिसांना सुनेला आणि तिच्या फेसबुकवरील मित्राला अटक केली आहे.