‘वर्क फ्रॉम होम’मुळे येतोय डोळ्यांवर ताण : डॉ हेमंत तोडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनने केवळ सांधे, पाठ, गुडघा, वजन वाढण  यासारख्या आजारच नाही तर डोळ्यांच्या समस्या देखील वाढल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान डोळ्यांचा ताण, थकवा किंवा डोकेदुखी ही काही सामान्य तक्रारी आहेत. २०-२०-२० नियम पाळा, कमीतकमी २० मिनीटांनी, २० सेकंदात, २० फूट अंतरावर काहीतरी पहात रहाण्याचा प्रयत्न करा, इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वावरपर मर्यादा आणा. मधुमेहाचे व्यवस्थापन करा.

गेल्या कित्येक महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लास, चष्म्याचा नियमित वापर न करणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसचा डोळ्यांवर येणारा ताण, डोळ्यांची योग्य काळजी न घेणे यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये मायोपिया अधिक सामान्यपणे दिसून येते. जवळपास डोळ्यांच्या समस्यांमधे 30% वाढ झाली आहे. गॅझेटमधून बाहेर येणा निळ्या प्रकाशाच्या दीर्घकाळ प्रदर्शनामुळे कोरडेपणा, जळजळ, पाणी येणे, लालसरपणा, अंधुक दृष्टी, डोळा दुखणे, दुहेरी दृष्टी आणि डोकेदुखी देखील होते. एक चमकदार खोली देखील आपल्या डोळ्याच्या स्नायूंसाठी त्रासदायक असू शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यांचा त्रास आणखी वाढू शकतो असे डॉ. हेमंत तोडकर, सल्लागार नेत्रतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे यांनी स्पष्ट करतात.

डॉ. तोडकर पुढे म्हणाले, डोळ्याच्या आरोग्यावर विचार करण्यासाठी मॉनिटरसाठी एक अँटी ग्लेअर स्क्रीन वापरा, वारंवार ब्रेक घ्या, तुमच्या टेक्स्टचा आकार वाढवा, तुमचे फोन किंवा टॅब्लेट तुमच्या मांडीवर 90 अंशांवर धरा, डोळ्यांच्या स्नायुंवर ताण येणार नाही याची काळजी घ्या. डोळ्यांच्या स्नायूंवर येणारा ताण तसेच कोरड्या डोळ्यांची समस्या टाळण्यासाठी वारंवार डोळ्यांवर पाणी मारणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, अल्कोहोल आणि धूम्रपान सोडा, चष्मा घालणे, अंधुक प्रकाशाखाली काम करा. डोळ्यांची नियमित