सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! Work From Home बाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government) सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना (Corona) संकटामुळे केंद्र सरकारने कोरोना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर Work From Home सुरु केलं होतं. फक्त 25, तर कधी 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहून काम करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र आता देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे Work From Home बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सरकारच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सोमवार (दि.7) पासून कामावर हजर रहावे लागणार आहे. हा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयातील 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी यासंदर्भात माहिती दिली.

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) नवी रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता.
त्यामुळे देशभरातील भीतीचं वातावरण होत.
मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी दैनंदीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.
त्यामुळे चिंता वाढली होती. विशेष म्हणजे नवी दिल्लीत संसत भवनातील (Sansat Bhavan) अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

याशिवाय मुंबईत विधान भवनात (Vidhan Bhavan) कोरोनाने शिरकाव केला होता.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गेल्या महिन्यात Work From Home च्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत.
त्यामुळे केंद्र सरकारने Work From Home बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title :-  Work From Home | union minister jitendra singh said full office attendance for all central govt employees from monday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thergaon Queen | पोलीस ठाण्यातून बाहेर येताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा, व्हिडीओ व्हायरल

 

Pune Crime | खळबळजनक! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हाताचा भाग

 

Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus