Work from Home | आयटी क्षेत्रात काम करणार्‍यांना आता ‘वर्क फ्रॉम होम’साठी डिसेंबर 2023 पर्यंत परवानगी; वाणिज्य मंत्रालयाची अधिसूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळामध्ये अनेकांना त्यांचे काम घरून (Work From Home) करावे लागले. जसजसा कोरोनाचा प्रभाव कमी झाला तसतसा लोकांचा ऑफिसकडे येण्याचा वेध वाढला. तरीही जर तुम्ही तुमचे काम घरून म्हणजे वर्क फ्रॉम होम (work from home) करू इच्छिता, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाणिज्य मंत्रालयाने विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) युनिट्समध्ये असलेल्या आयटी/ आयटीईएस (IT/ITeS) कंपन्यांच्या १०० टक्के कर्मचाऱ्यांना काही अटींवर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना वाणिज्य मंत्रालयाने जारी केली आहे.

मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, “एखादे युनिट त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना घरून किंवा SEZ क्षेत्राबाहेरून कोणत्याही ठिकाणी काम करण्याची परवानगी देऊ शकते.” याआधी SEZ मध्ये जास्तीत जास्त एक वर्ष वर्क फ्रॉम होमची परवानगी होती आणि एकूण कर्मचार्‍यांपैकी कमाल ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी परवानगी होती.

त्या परवानगीसाठी, SEZ युनिट मालकांना संबंधित झोनच्या विकास आयुक्तांना तसे कळवावे लागेल आणि
मंजुरीच्या पत्रानुसार ते त्यांच्या ठिकाणांवरून काम सुरू ठेवू शकतात.
भविष्यात वर्क फ्रॉम होम करू इच्छिणारे युनिट्स वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या तारखेला किंवा त्यापूर्वी मेल करून कळवू शकतात.
युनिटला वर्क फ्रॉम होम किंवा SEZ बाहेर कोणत्याही ठिकाणाहून काम करण्याची परवानगी असलेल्या कर्मचार्‍यांची यादी सादर करण्याची गरज नाही. तरीही त्यांना तशी यादी त्यांच्याकडे ठेवावी लागेल.
जे तात्पुरते कामावर येण्यास सक्षम नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी आहे.
तसेच वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, संबंधित कर्मचाऱ्यांना घरून काम (work from home)
करण्यासाठी लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा इतर उपकरणे कंपनीने कर्मचाऱ्याला पुरवावी लागतील.

Web Title :- Work from Home | work from home for it ites companies permitted in sez units till december 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | खळबळजनक ! मित्र-मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा सपासप वार करून खून; तळजाई परिसरातील घटना

Teachers Exam | शिक्षणाचा दर्जा ढासळल्यानं आता शिक्षकांचीच परीक्षा होणार, विभागीय आयुक्तांचा निर्णय

Pune Street Walk Day | पुण्यातील रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे ‘राज्य’; सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ‘पादचारी दिना’निमित्त वाहनांना प्रवेशबंदी