पोलीसनामा ऑनलाईन टीम – केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागच्या २-३ वर्षांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरु होते. मात्र आता हे वर्क फ्रॉम होम बंद होणार आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाइन काम करणाऱ्या बहुतांश लोकांना घरून काम करण्याच्या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता वर्क फ्रॉम होम (Work From Home) हे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत हि घोषणा केली आहे. त्यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना शारीरिकरित्या कार्यालयात येण्याचे आवाहन केले आहे. तसेच आता घरून काम करण्याचा नियम सर्वसाधारणपणे लागू होऊ दिला जाणार नाही, असेदेखील ते म्हणाले.
लोकसभेत भाजप खासदार रंजनबेन धनंजय भट्ट आणि खासदार श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हि माहिती दिली. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची परवानगी शक्य नाही. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे आवश्यक असल्याचे कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयातील मंत्री म्हणाले आहेत. कामाचे स्वरूप आणि त्याच्या कार्यात्मक गरजा लक्षात घेता, सरकारमधील बहुतांश भूमिकांसाठी ऑनलाइन काम करणे शक्य नाही असेदेखील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले आहेत. (Work From Home)
कोविड-19 महामारीच्या काळात कार्यालयात सामाजिक अंतराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून घरून मध्यम/कनिष्ठ कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली होती.
आता सर्व काही सुरळीत झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या काळात काम करण्याचा नियम जवळपास सर्वच क्षेत्रात लागू करण्यात आला होता. आता कोरोना संपल्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा ऑफिसला बोलवण्यात आले आहे.
Web Title :- Work From Home | work from home is close for central government employees minister said in loksabha
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले