काय सांगता ! होय, वर्क फ्रॉम होममुळं भारतीयांचं काम सरासरी तब्बल एवढया मिनिटांनी वाढलं

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन काळात अनेक कंपन्यांनी सर्वाना वर्क फ्रॉम होम दिल होत. अजूनही ते सुरूच आहे. यामुळे कामाच्या तासांमध्ये वाढ झाली आहे हे जर कोणाला पटत नसेल तर ऑस्ट्रेलियातील ऍट्लासन या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध झालाय यातून भारतीयांच्या कामाच्या तासांत वाढ झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे. यात इस्राइल सर्वात आघाडीवर आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यात इस्राइलमधील नागरिकांनी दिवसाला सरासरी ४७ मिनिटं जास्त काम केलं. तर भारतीयांनी दररोज सरासरी ३२ मिनिटं जास्त वेळ काम केल्याचं अहवालात नमदू केले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही हेच प्रमाण आहे.

या अहवालात असे म्हंटले आहे की, वर्क फ्रॉम होममध्ये कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक काम करत असून दुपारी सर्वात कमी काम होत असत. अनेकांनी कामाच्या तासांत वाढ होण्याचं स्वीकारलं आहे. त्यामुळे घर आणि ऑफीस अशा दोन गोष्टी कर्मचाऱ्यांना वेगळ्या राखता येणं कठीण होऊन बसलं आहे. काहीजण कोणतीही ब्रेक न घेता सलग काम करत आहेत. कोरोना काळात कामाच्या सीमा निश्चित करणं आता कठीण होऊन बसल्याचं अनेकांचं मत आहे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे २३ टक्के लोक काम संपल्यानंतरहि आपल्या वैयक्तिक वेळेत कामाचाच विचार करत असल्याचं समोर आले आहे.

कुटुंबाला फार कमी वेळ देता येतोय
‘वर्क फ्रॉम होम’मुळे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही असल्याची चर्चा आहे. याच संदर्भात बोलताना हैदराबाद स्थित आयटी कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असलेले पुनीत श्रीवास्तव म्हणतात की, लॉकडाउनच्या आधीच्या वर्क फ्रॉम होममध्ये एक सुसंवाद होता. त्यावेळी घरची कामं संपवून डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेत जाण्यासाठी वेळ मिळत होता. पण आता मी घरी लॅपटॉपला खिळून असतो. कोणत्याही क्षणी व्हिडिओ मिटिंग्जसाठी आम्हाला उपलब्ध राहावं लागतं.