सराफाच्या ४ लाखांच्या सोन्यावर कारागिराचा डल्ला

 मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

सराफा दुकानातील कारागिराने चार लाखांचे सोने चोरून पोबारा केल्याची घटना मिरजेत घडली आहे. येथील सराफ महेश सूर्यकांत शहा यांच्या दुकानात तो काम करत होता. त्याचे नाव सूरजअली रफीकअली शेख (२१, रा. काटापूर, पश्‍चिम बंगाल) असे असून तो सध्या फरार आहे. शहर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B01J82IYLW,B01GZPDV2W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b63340b0-b447-11e8-9c0e-71b24f6c38e9′]
याबाबत निजामुद्दीन जलालुद्दीन शेख (रा. शनिवार पेठ, मिरज) यांनी तक्रार दिली आहे. निजामुद्दीन यांच्या घराच्या तिस‍ऱ्या मजल्यावर सोन्याचे दागिने तयार केले जातात. येथील सराफ महेश शहा यांच्याकडून नेकलेस बनवण्यासाठी १४४ ग्रॅमचे सोने निजामुद्दीन शेख यांनी घेतले होते. शेख यांनी नेकलेस तयार करण्यासाठी ते सोने त्यांच्याकडील कारागीर सूरजअली शेख याला दिले. मात्र ते सोने घेऊन कारागीर सूरजअली गायब झाला. सूरजआली सोने घेऊन फरार झाल्याचे समजल्यानंतर निजामुद्दीन यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी