क्रशर मशीनमध्ये चिरडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळील गुंदले गावात क्रशरच्या मशीनमध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली आहे. संजय गणेशकर (वय-४५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. संजय क्रशर मशीनजवळ सफाईचे काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो मशीनमध्ये अडकला.

गुंदले गावातील लकी स्टोन क्रशर मशीनवर संजय कामाला होता. आज सकाळी तो मशीनजवळ सफाई करत असताना त्याचा तोल जाऊन तो मशीनमध्ये पडला. तो पट्ट्यात अडकला आणि थेट दगडांचे तुकडे करणाऱ्या मशीनमध्ये खेचला गेला. यात त्याचा हृदयद्रावक अंत ओढवला . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बोईसर परिसरात दगडखाणी आणि क्रशर मशीन मोठ्या प्रमाणात असून नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप होत आहे. ही मशीन चालवत असताना निष्काळजीपणामुळे अशाप्रकारचे अपघात नेहमीच होत असतात. दोन दिवसांपुर्वीच नागझरी गावाच्या हद्दीत मासे पकडण्यासाठी दगड खाणींसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनचा स्फोट करण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us