कामगारांनी केला असा जबरदस्त डान्स, लोकांना आठवला मायकल जॅक्सन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कधीकधी सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात की, ते पाहिल्यानंतर कोणाचेही मन आनंदित होते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक कामगार जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर बिल बर्टल्सने शेअर केला आहे. शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मायकेल जॅक्सनने हुबेई मधील एका बांधकाम साइटवर पुनर्जन्म घेतला ‘

व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, एका ठिकाणी काही बांधकामांचे काम चालू आहे. इथे बरेच मजूर एकत्र बसले आहेत. यातील एक कामगार लाकूड घेऊन उठला आणि नाचू लागला. या मजुराने इतका छान डान्स केला की, त्याने सर्वांचे मन जिंकून घेतले. त्याचे इतर सहकारीही हे नृत्य पहात होते. या मजुराच्या डान्स स्टेप्स इतक्या जबरदस्त होत्या की सर्वांनाच आश्चर्य वाटले.

लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाईक करत आहेत आणि मजुराचीही प्रशंसा करीत आहेत. सध्या हा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.