अंगावर क्रेन पडल्याने कामगाराचा ‘मृत्यू’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शेलारवाडी येथे अंगावर क्रेन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सातच्या सुमारास घडली. रामअवतार निषाद (22, रा.पाटील नगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. मयत रामअवतार कुशवाह इंडस्ट्रीज या कंपनीत काम करत होता. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शेलारवाडी तळवडे येथील साईटवर काम करत असताना क्रेन रामअवतारच्या अंगावर पडले. यामध्ये रामअवतारच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.

त्याला तात्काळ उपचारासाठी चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नेहरूनगर येथील आणखी दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेही उपचार न झाल्याने त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस तपास करत आहेत.

Visit : Policenama.com