Worker dies in Pimpri | पिंपरीत क्रेन जागेवरुन उखडल्याने धक्का लागून 11 व्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यु

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  बांधकाम क्रेनच्या सहाय्याने सिमेंटच्या चौकटी ११ व्या मजल्यावर नेत असताना क्रेन जागेवरुन उखडल्याने क्रेनचा मागून धक्का बसल्याने कामगार ११ व्या मजल्यावर लिफ्टच्या डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यु (Worker dies in Pimpri ) झाला.
Worker dies in Pimpri | In Pimpri, a crane overturned and fell from the 11th floor, killing the worker

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

लखन मच्छिीद्र पवार (वय २८, रा. मामुर्डी, ता. हवेली) असे मृत्यु पावलेल्या कामगाराचे नाव आहे.
ही घटना किवळे येथील मंगल विश्व कन्स्ट्रक्शन साईटवर (Mangal Vishwa Construction Site) बुधवारी १६ जून रोजी दुपारी २ वाजता घडली.
याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी (Dehurod Police) सुरेश पांडुरंग आडे आणि दयानंद पांडुरंग आडे या बांधकाम ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत काजल लखन पवार (वय २६, रा. डिफेन्स कॉलनी, मामुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.
लखन पवार हे मंगल विश्वस कन्स्ट्रक्श्न साईटवर काम करत होते. या साईटवर केबलची क्रेन लावण्यात आली आहे.
तळमजल्यावरुन ११ व्या मजल्यावर पवार हे सिमेंटच्या चौकटी घेऊन जात होते.
त्यांना हे काम येत नसतानाही ते काम करावयास लावून त्यांना कामास हेल्मेट, शेफ्टी बेल्ट अथवा इतर सुरक्षा साहित्य पुरविण्यात आले नव्हते.
पवार हे क्रेनने केबलच्या सहाय्याने सिमेंट चौकटी तळमजल्यावरुन ११ व्या मजल्यावर घेऊन जात असताना क्रेन जागेवरुन उखडली गेली.
त्यामुळे क्रेनचा मागून धक्का बसल्याने पवार हे ११ व्या मजल्यावर तळमजल्यावरील लिफ्ट डक्टमध्ये पडले.
त्यांच्या अंगावर क्रेन पडून त्यात डोक्याला व शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा होऊन त्यांचा मृत्यु (Worker dies in Pimpri) झाला.
त्यांच्या मृत्युस कारणीभूत झाल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Worker dies in Pimpri | In Pimpri, a crane overturned and fell from the 11th floor, killing the worker

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

double murder in pune | मुलगा आयान, आई आलिया अन् आता वडिल आबिदचा मृतदेह आढळल्याने पुण्यात प्रचंड खळबळ