कारागिरानेच चोरला सव्वा लाखाचा ऐवज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराने दुकानातील पैसे आणि सामान असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास विशालनगर येथील कटिंग टाईम या दुकानात उघडकीस आली.

अली रफिक सलमानी (32, रा. बालेवाडी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सदारत अली (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलमानी यांचे विशालनगर, सांगवी येथे ‘कटिंग टाईम’ नावाचे सलुन दुकान आहे. या दुकानात आरोपी सदारत कारागीर म्हणून काम करत होता. रविवारी रात्री दहा ते सोमवारी सकाळी आठ या कालावधीत आरोपीने दुकानाच्या ड्रॉवर मधील पैसे, दानपेटी आणि पार्लरचे साहित्य असा एकूण 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

भोसरीत एकाला मारहाण

शांतीनगर झोपडपट्टी भोसरी येथे सोमवारी रात्री एकाला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी गुणवंत दादाराव गंगावणे (55, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर अनिल गायकवाड (रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास रात्रीचे जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी घरासमोर जात होते. त्यावेळी त्यांच्या घराजवळ राहणारा आरोपी अनिल त्यांच्या घरासमोरून जात होता. ‘माझ्याकडे रागाने का पाहतो?’ असे म्हणत अनिल याने गुणवंत यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू गुणवंत यांच्या डोक्यात मारला. यामध्ये गुणवंत जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com