रोनाल्डो विरोधात कामगारांचे आंदोलन

माद्रिद : व्रतसंस्था

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू आणि जगभरातील फुटबॉल प्रेमीच्या गळ्यातील ताईत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या विरोधात इटलीमधील फियाट ख्रिसलर आॅटोमोबाईल कंपनीच्या कामगारांनी निषेध व्यक्त केला असून त्याविरोधात ते येत्या १५ आणि १७ जुलैला संपावर जाणार आहेत. याला कारण ही तसेच आहे.

[amazon_link asins=’B075MZ2Q8Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2dee0b53-8654-11e8-8d73-01990aa4a67f’]

पोर्तुगालच्या या स्टार फुटबॉलपटूने इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. रोनाल्डोकरिता अब्जावधी रक्कम खर्च करण्यापेक्षा कंपनीने हीच रक्कम नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी खर्च करणे उचित ठरले असते. केवळ एखाद्या खेळाडूसाठी एवढी गुंतवणूक करणे अयोग्य आहे, असे या कामगारांचे नेते लॅव्हेरो प्रिव्हाटो यांनी म्हटले आहे. अ‍ॅग्नेली हे युव्हेंटस संघाचे तसेच फियाट ख्रिसलर आॅटोमोबाईल कंपनीचे मालक आहेत.

जुवेंटस ने बुधवारी जशी सुपरस्टार स्ट्राइकर रोनाल्डोची नवी जर्सी नंबर ७ आपल्या आॅनलाईन शॉपिंग साइटवर टाकली. त्यानंतर काही वेळातच ही साईट ठप्प झाली. रियल मैड्रिडकडून खेळताना रोनाल्डोच्या जर्सीचा नंबर ७ होता. तोच आता जुवेंटससाठी कायम ठेवण्यात आला आहे.

क्रोएशियाच्या मंत्रिमंडळाचे देशप्रेम

क्रोएशियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे देशाचे पंतप्रधानही सध्या भलतेच खूश आहेत. आंद्रेज प्लेनकोव्हिच आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी एका सत्रासाठी चक्क क्रोएशिया संघाची लाल व पांढºया रंगाची जर्सी परिधान करून अंतिम फेरीसाठी आपल्या संघाला शुभेच्छा दिल्या.

आयफेल टॉवर रविवारी बंद

विश्वातील लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ म्हणून लौकिक असलेले पॅरिसमधील आयफेल टॉवर रविवारी होणाऱ्या  विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. अंतिम लढतीचा चाहत्यांना मोठ्या पडद्यावर आनंद लुटता यावा, यासाठी आयफेल टॉवरजवळील चँप डी मार्स पार्क येथे सोय करण्यात आली असून त्याकरिता या ऐतिहासिक वास्तूला धोका उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.