कामगारांना मोठा दिलासा मिळणार ! 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल भरपाई; एक दिवस उशीर झाला तरी द्यावं लागणार 12 % व्याज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून Union Ministry of workers मजूरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कामगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 चा मसुदा जारी केला आहे. यामध्ये प्रस्ताव दिला आहे की, जर कर्मचारी Employees काम करताना जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू Death झाला तर कंपनीला कर्मचार्‍याला कॉम्पनसेशन (भरपाई) एक महिना म्हणजे 30 दिवसांच्या आत द्यावी लागेल. यानंतर एक दिवस उशीर केल्यास कंपनीला Company 12 टक्केच्या साधारण व्याजदराने भरपाईची रक्कम द्यावी लागेल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

कामगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या अंतर्गत कर्मचार्‍यांच्या भरपाईशी संबंधित मसुदा नियम संबंधीत पक्षांकडून सूचना आणि आक्षेपांसाठी अधिसूचित केला आहे. वक्तव्यानुसार जर काही सूचना आणि आक्षेप असतील, तर ते मसुदा नियमांच्या अधिसूचनेच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत द्यायचे आहेत.

सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या भाग सात (कर्मचार्‍याची भरपाई ) मध्ये इतर गोष्टींसह दुर्घटना, गंभीर शारीरिक दुखापत किंवा कामाशी संबंधीत रोगांच्या प्रकरणात भरपाईसाठी कंपनीच्या जबाबदारीशी संबंधीत तरतुदींचा समावेश केला आहे.

राजकीय पटावर शरद पवार यांची मोठी चाल ! काँग्रेसला वगळून इतर विरोधी पक्षांसोबत उद्या दिल्लीत घेणार बैठक

अशाप्रकारे केली जाईल गणना
सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम 76 नुसार, दुखापतीमुळे मृत्यूप्रकरणात भरपाईची रक्कम मृत कर्मचार्‍याच्या मासिक वेतनाच्या 50% असावी, ज्यास केंद्र सरकारच्या रेलिव्हंट फॅक्टरने गुणले जाईल.

अशाप्रकारे दुखापतीमुळे कायस्वरूपी अक्षम होण्याच्या स्थितीत, जखमी कर्मचार्‍याच्या वेतनाच्या 60 टक्केच्या बरोबरीने भरपाई असावी. यास सुद्धा केंद्र सरकारच्या रेलिव्हंट फॅक्टरने गुणले जाईल.

नवीन कायद्यात अनेक बदल
केंद्र सरकारद्वारे अधिसूचित कर्मचार्‍याच्या भरपाईशी संबंधति मसुदा नियमात दावे निकाली काढण्यासाठी अर्जाची पद्धत,
भरपाईच्या विलंबानंतर पैसे देताना द्यावा लागणारा व्याजदर,
कार्यवाहीचे स्थान आणि प्रकरणांचे हस्तांतरण,
नोटीस आणि सक्षम अधिकार्‍यांकडून दुसर्‍या अधिकार्‍याला पैस हस्तांतरित करण्याची पद्धत
आणि भरपाईच्या रूपात दिलेल्या पैशाच्या हस्तांतरणासाठी इतर देशांसोबत केल्या जाणार्‍या व्यवस्थेशी संबंधीत तरतुदींचा समावेश आहे.

कामगारांना workers सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्याची तयारी
केंद्र सरकारची योजना देशभरातील असंघटीत क्षेत्रात कामर करणार्‍या कामगारांना सामाजिक सुरक्षेचा Social security to workers लाभ देण्याची आहे.

याच पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षा संहिता,
2020 च्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी,
कर्मचारी राज्य विमा निगम, ग्रॅच्युटी, मातृत्व लाभ,
घर तसेच इतर बांधकामाशी संबंधीत मजूरांच्या संदर्भात सामाजिक आणि उपकर,
असंघटीत क्षेत्रातील मजूर, तासावर काम करणारे किंवा अंशकालिन काम करणारे,
तसेच प्लॅटफॉर्म वर्कर्स (ऑनलाइन प्लॅटफार्मच्या द्वारे सेवा देणार्‍या संघटनांसाठी काम करणारे कर्मचारी) साठी सामाजिक सुरक्षा आणि रोजगारशी संबंधीत माहितीशी संबंधित मसुदा नियम 13 नोव्हेंबर, 2020 ला अधिसूचित करण्यात आला होता.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : workers are going to get big relief compensation will have to be given within 30 days 12 percent interest will be given on delay

हे देखील वाचा

Fraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी केला विवाह; मुलीच्या भावासह 50 ते 60 जणांची लाखोंची फसवणूक

Suicide News | धक्कादायक ! पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या