ईदच्या दिवशी ‘अनर्थ’ टळला, एकीकडे ‘नमाज’ तर त्याला विरोध म्हणून ‘हनुमान’ चालीसा पठन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रस्तावरच हनुमान चालीसाचे पठन करण्यात सुरुवात केली. आग्राच्या खंदौलीमध्ये रस्त्यावर ईद उल जुहा ने नमाज पठणासाठी ट्रॅफिक थांबवल्याच्या रागातून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तेथेच हनुमान चालीसा पठन करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांना मध्यस्थी करुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शांत केले. आज बकरी ईद असल्याने ठिकठिकाणी नमाजचे पठन करण्यात येत होते. याच दरम्यान हा गंभीर प्रकार घडला. ऐन ईदीच्या दिवसी असा प्रकार घडल्याने परिसरात तणावचे वातवरण होते.

हा प्रकार सोमवारी सकाळी आग्रा अलीगड हायवे दरम्यान असलेल्या खंदोली दरम्यान घडला. येथे ईदगाहच्या बाहेर रस्त्यावर मुस्लिम बांधव नमाजाचे पठन करण्यास बसले होते. नमाज पठन सुरु झाल्याने प्रशासनाने सावधानी म्हणून आग्रा अलीगड हायवेवरील वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे रस्त्याचा दोन्ही बाजूंना वाहतूक जाम झाली होती. याच ट्रॅफिक जाममध्ये बजरंग दलाच्या सदस्यांची बस होती.

हे सर्व बजरंग दलाचे सदस्य अलीगड आणि त्या आसपास राहणारे आहेत. वाहन रोखण्यात आल्याने हे कार्यकर्ते भडकले होते. यामुळे या भागात तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. या बस मधील अनेक कार्यकर्ते बसमधील खाली उतरले आणि त्यांनी जय श्रीरामचे नारे देण्यास सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांबरोबर त्याचा वाद देखील झाला, याच दरम्यान बजरंग दल कार्यकर्ते उतरुन हनुमान चालीसा पठन करण्यास बसले.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी एत्मादपूरचे सीओ अतुल सोनकर तेथे पोहचले. बराच काळ समजावल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथील उठले आणि पुढे रवाना झाले. परंतू या वादाने या भागात तणावात्मक वातावरण निर्माण झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like