पुरूषांच्या केसगळतीचं नवं कारण आलं समोर, जाणून घ्या अन्यथा..

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे केसगळती. केसगळतीच्या समस्येवर वेळीच उपाय न केल्यास टक्कल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच केसलगळती ही एक गंभीर समस्या बनली असून, लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. नॅशनल हेल्थ सर्वे NHS नुसार, एका व्यक्तीचे दररोज ५० ते १०० केस गळतात. ज्यावर आपलं लक्ष जात नाही. ताणतणाव, अपुरी झोप, पौष्टिक आहाराचा अभाव इत्यादी कारणांमुळे केसगळतीची समस्या उद्भवते. पण आता एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे की, तुम्ही किती तास काम करता, यामुळे सुद्धा तुमची केसगळती होऊ शकते.

१. आठवड्यातून किती जास्त काम केल्यास केळसगळती

वीस ते तीस वर्षा दरम्यानची पुरुष एका आठवड्यात ५२ तासांपेक्षा जास्त काम करत असतात, त्यांचे केस अधिक गळतात. इतकेच नाही तर अधिक वेगाने गळतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आठवड्यातून ५ वर्किंग डे नुसार जर तुम्ही प्रत्येक दिवशी १० तासांपेक्षा अधिक काम करत असाल तर इतरांच्या तुलनेत तुमचे केस अधिक गळतील.

२. अति कामाचा तणाव असल्यास हेअर फॉलिकल्सचं नुकसान

संशोधनात सहभागी असलेल्या सर्वच लोकांच्या लाइफस्टाईल मध्ये होणारे बदल आणि मॅरिटल स्टेटस लक्षात घेऊन काढलेले हे निष्कर्ष सर्वच सहभागी लोकांसाठी एकसारखेच होते. अभ्यासकांनी सांगितल्यानुसार, फार जास्त काम केल्याने आणि शरीराला आराम न भेटल्याने हेअर फॉलिकल्सचं नुकसान होतं. ज्यामुळे केस कॅटेजन फेसमध्ये पोहचतात, जिथे केसांची वाढ होणे बंद होते.

३. १३,३९१ पुरुषांवर केलं गेलं संशोधन

या संशोधनात १३ हजार ३९१ नोकरी करणाऱ्या पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. अशाप्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे. ज्यात कामाच्या जास्त वेळेचा केसांसोबत काय संबंध असतो यासंदर्भात सांगितलं गेलं आहे. आठवड्यातून ४० तास काम करणाऱ्याला नॉर्मल कॅटेगरीत ठेवलं तर आठवड्यातून ५२ तास काम करणाऱ्याला लॉंग वर्किंग आवर्समध्ये ठेवण्यात आलं. कामाचा जास्त वेळ आणि केसगळतीचा थेट संबंध या संशोधनातून समोर आला आहे.