मधुमेही रूग्णांसाठी खुपच फायदेचे आहेत ‘हे’ 4 वर्कआऊट, मात्र सकाळी केल्यास नाही होणार फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मधुमेहाने त्रस्त असलेल्याना व्यायामाची नितांत गरज असते. चालणे, धावणे, सायकलिंग करणे, झुंबा नृत्य, असे व्यायाम उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्याविषयी माहिती…

सायकलिंग हा सर्व व्यायामांपैकी एक उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्यामुळे हाडे मजबूत होतात. तर चालणे नको असल्यास सायकल चालवायला पाहिजे. बाजारात जाताना कार किंवा दुचाकीऐवजी सायकल चालवा. मधुमेह तसेच लठ्ठपणा त्वरित कमी होतो. मधुमेहाचे रुग्ण वजनाची विशेष काळजी घेतात. असे बरेच लोक जे सकाळी व्यायाम करतात; परंतु जर तुम्ही सकाळी किंवा रात्री फिरायला गेलात तर तुमचा फायदा कमी होईल.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार मधुमेहाचे रुग्ण जर दुपारी व्यायाम करत असतील तर त्यांचा जास्त फायदा होईल आणि ते त्यांच्या शरीरासाठी चांगले असेल. विशेषत: ज्यांना टाइप -२ मधुमेह आहे त्यांनी दुपारी व्यायाम केला पाहिजे. तसे केल्यास आपल्या शरीरात अधिक सुधारणा दिसेल. दुपारी व्यायाम केल्याने साखर मोठ्या प्रमाणात नियंत्रित राहते, असेही संशोधनातून समोर आले आहे. म्हणून दुपारी व्यायाम करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. आता तुम्हाला अशा काही वर्कआउट्सविषयी सांगू जे मधुमेह रुग्ण करू शकतात आणि त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालणे. जर तुम्हाला जिमला जायला वेळ नसेल तर तुम्ही जर घरात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर थोडे चालला तर तुमचे वजन कमी होईल आणि तुमची साखरही नियंत्रणात राहील. ज्यांना कोणताही आजार नाही त्यांच्यासाठी योग सर्वोत्तम आहे. कारण, आपल्याला योगापासून बरेच फायदे मिळतात. जर झोपेची समस्या दूर झाली तर रक्तदाब देखील सुधारतो. तुमची साखरही नियंत्रणात राहते. झुम्बा नृत्य देखील आपल्यासाठी चांगल आहे. यावर केलेल्या संशोधनानुसार जर आपण आपल्या रूटीनमध्ये एरोबिक नृत्य किंवा झुम्बा केला तर शरीराला खूप फायदा होतो.