Workout | महिलांनो, असे करत असाल वर्कआऊट तर व्हा सावध; अन्यथा होऊ शकते दुप्पट नुकसान, जाणून घ्या कधी स्कीप करावी एक्सरसाईज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Workout | वर्कआऊट करणे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे (Workout). पण अशा काही स्थिती आहेत ज्यात महिलांनी वर्कआऊट करू नये. कोणत्या स्थितीमध्ये व्यायाम (Exercise) केल्याने महिलांचे नुकसान होऊ शकते ते जाणून घेवूया. या काळात महिलांनी व्यायाम करणे टाळावे आणि विश्रांती घ्यावी (Rest Day For Workout).
1. सर्जरीनंतर (Surgery)
जर एखाद्या महिलेची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल तर तिने काही दिवस व्यायाम करणे थांबवावे. वर्कआउट पुन्हा सुरू करण्यापूर्वी, कृपया एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. प्रेग्नंसीमध्ये (Pregnancy)
प्रेग्नंट महिलांनी व्यायाम करू नये. तरीही एखाद्या गर्भवती महिलेने वर्कआउट करण्याचा निर्णय घेतला असेल तर तिने प्रथम तिच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे देखील लक्षात ठेवा की या काळात फक्त सोपे व्यायाम करा. (Workout)
3. पीरियड्समध्ये (Periods)
मासिक पाळीत वर्कआउट करू नये, असा कोणताही नियम नाही. परंतु ब्लड फ्लोमुळे शरीरात विकनेस असतो. ज्यामध्ये महिलांना विश्रांतीची आवश्यकता असते. म्हणूनच अशा वेळी वर्कआउट्स स्कीप करणे हा एक चांगला पर्याय आहे.
4. बॉडी पेनमध्ये (Body Pain)
शरीरात वेदना होत असतील तर अशा वेळी व्यायाम करणे टाळा, कारण अशा स्थितीत व्यायाम केल्याने वेदना वाढू शकतात.
जेव्हा वेदनांपासून आराम मिळतो, तेव्हाच वर्कआऊट सुरू करा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Workout | when its harmful to exercise when women should skip workout
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्या 48 वर्षाच्या नराधमाला अटक