Workouts For Depression | डिप्रेशनची लक्षणे कमी करू शकतात 4 परिणामकारक वर्कआऊट, जाणून घ्या कोणती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Workouts For Depression | विविध प्रकारचे वर्कआऊट्स देखील डिप्रेशनशी (Depression) लढण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीदरम्यान बॉडीसोबत आपले माईंड सुद्धा एंगेज असते, त्यामुळे तणावाच्या कारणांकडे लक्ष दिले जात नाही (Workouts For Depression). वर्कआऊटमधून हॅप्पी हार्मोन्स देखील स्रवतात, ज्यामुळे मूड चांगला राहतो. यासाठी कोणते वर्कआऊट्स फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया (Workouts That Are Very Effective In Reducing The Symptoms Of Depression).

 

1. रनिंग (Running)
नियमित धावण्याने स्नायू तयार होतात तसेच हृदयासोबतच मेंदूही निरोगी (Brain Healthy) राहतो. धावण्याने शरीरात डोपामाईन आणि सेरोटोनिन सारख्या होर्मोन्सचा स्राव सुरू होतो आणि कॉर्टिसॉलची पातळी कमी होते, जे एक तणाव वाढवणारे हार्मोन आहे. तणावाच्या स्थितीत हे हार्मोन जास्त तयार होते. रनिंग हे कमी करण्यासाठी प्रभावी आहे (Workouts For Depression).

 

2. वेट लिफ्टिंग (Weight Lifting)
वेट लिफ्टिंगद्वारे हलका तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी केली जाऊ शकतात. वेट ट्रेनिंग दरम्यान संपूर्ण लक्ष हात आणि शरीरावर असते, इतर गोष्टींकडे लक्ष जात नाही. तसेच वजन उचलल्याने स्नायू टोन्ड आणि मजबूत होतात. एकूण शरीर तंदुरुस्त दिसते.

3. योगा (Yoga)
धावण्याशिवाय योग ही सर्वोत्तम फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आहे. शरीराच्या विविध मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान तुमच्या मनावर तसेच शरीरावर काम करतात. तज्ज्ञ तणाव दूर करण्यासाठी ध्यान करण्याचा सल्लाही देतात. नियमित फक्त 1/2 तास योगाभ्यास केल्याने तुम्हाला बरे वाटेल.

 

4. सूर्यप्रकाश घ्या (Take Sunlight)
फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी कोणतीही असो, बागकाम असो, मुलांसोबत खेळणे असो किंवा गाडी धुणे असो, ती तुम्हाला रिचार्ज करण्याचे काम करते
याशिवाय, सूर्यप्रकाश घेणे हे तणाव, चिंता आणि नैराश्य दूर ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
सूर्यप्रकाशामुळे शरीरात सेरोटोनिन तयार होते, ज्यामुळे मूड प्रसन्न राहतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Workouts For Depression | workouts for depression workouts that are very effective in reducing the symptoms of depression

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Management | ‘या’ 5 टिप्स केल्या फॉलो, तर उन्हाळ्याच्या हंगामात सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज!

 

Breast Cysts | जाणून घ्या काय आहेत ‘ब्रेस्ट सिस्ट’ची 4 लक्षणे आणि उपचार

 

Pregnancy Inners | प्रेग्नंसी दरम्यान असे असावेत महिलांचे इनरवेअर्स, इन्फेक्शनपासून होईल बचाव; जाणून घ्या