एड्सवर प्रभावी उपचार आजही नाहीत, जाणून घ्या महत्वाची माहिती अन् इतिहास

पोलीसनामा ऑनलाइन – एड्सविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक एड्स दिन दरवर्षी केला जातो. एड्स हा एक साथीचा रोग आहे, जो मानवी इम्युनोडेफिशियन्सी (एचआयव्ही) विषाणूच्या संसर्गामुळे होतो. 1995 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक एड्स दिनाची अधिकृत घोषणा केली आणि त्यानंतर जागतिक एड्स दिन संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. एड्स हा एक आजार आहे. तो शरीराच्या संसर्गाविरुद्ध लढण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. इतक्या वर्षांनंतरही एड्सवर प्रभावी उपचार झाले नाहीत.

पहिला जागतिक एड्स दिन –
जागतिक एड्स दिन पहिल्यांदा थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यू. बॅन यांनी 1987 मध्ये ऑगस्ट महिन्यात साजरा केला होता. थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यू. बॅन हे स्वित्झर्लंडच्या डब्ल्यूएचओच्या (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) जिनेव्हाच्या एड्स ग्लोबल प्रोग्रामचे सार्वजनिक माहिती अधिकारी होते. त्यांनी एड्स दिवसाची आपली कल्पना डॉ. जोनाथन मान (एड्स ग्लोबल प्रोग्रामचे संचालक) यांना सांगितली. त्यांनी या कल्पनेला मान्यता दिली आणि 1 डिसेंबर 1988 मध्ये जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला.

एड्सची पहिली घटना आफ्रिकेच्या कांगोमध्ये नोंदली गेली, त्यात एकाचा मृत्यू झाला. जेव्हा त्याच्या रक्ताची तपासणी केली गेली, तेव्हा त्याला एड्स असल्याची खात्री झाली. हा आजार 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला समोर आला आणि त्यानंतर जगभरातील कोट्यवधी लोकांवर या आजाराने आपले प्राण गमावण्याची वेळ आली.

भारतात एड्सची पहिली घटना 1986 मध्ये नोंदली गेली. एड्स संबंधित अधिक माहिती-
– एड्सवरील पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव ‘अँड बँड प्लेन ऑन’ होते.
-900 नवीन मुलांना जगभरात दररोज एड्स होत आहेत.
तापमान -60 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास एचआयव्ही विषाणूचा नाश होतो.

एड्सची लक्षणे
एचआयव्ही संक्रमित व्यक्तीमध्ये अशी लक्षणे आढळतात -घसा खवखवणे, रात्री घाम येणे, वाढलेली ग्रंथी,वजन कमी होणे, ताप, थंडी वाजून येणे, थकवा, अशक्तपणा, सांधेदुखी, स्नायू वेदना.