World AIDS Day 2020 : महिलांना HIV / AIDS झाल्यास शरीर देतं 14 इशारे, 5 संकेत आहेत कॉमन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   World AIDS Day : प्रत्येक वर्षी 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे साजरा केला जातो, ज्याचे लक्ष्य एचआयव्ही इन्फेक्शनचा प्रसारामुळे हाणारी महामारी एड्सबाबत जागृकता वाढवणे आहे. एचआयव्ही/एड्स एक भयंकर आजार आहे. डब्ल्यूएचओच्या 2017 च्या एका आकड्यानुसार, या जीवघेण्या आजराने सुमारे 36.9 मिलियन लोक पीडित आहेत.

वर्ल्ड एड्स डे 2020 थीम

जागतिक एड्स दिवस 2020 ची थीम ’एंडिंग द एचआयव्ही / एड्स पेंडेमिक म्हणजे एड्सची महामारी नष्ट करणे आहे. या थीमवरून समजते की, जर लोकांना एचआयव्हीचे उपचार आणि प्रतिबंधासाठी उच्च गणवत्तेच्या सेवा मिळाल्या तर, ते यावर नियंत्रण ठेवू शकतात.

हा दिवस साजरा करण्याची सुरूवात 18 मे 1997 ला त्यावेळी झाली, जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांनी मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एका भाषणात पुढील दशकाच्या आत विज्ञान आणि औद्योगिक प्रगती पाहता एड्स व्हॅक्सीन विकसित करण्यासाठी नवीन लक्ष्य ठरवली. त्यांनी म्हटले होते की, एड्सला केवळ एक प्रभावी व्हॅक्सीन रोखू शकते आणि धोका संपवू शकतो.

एड्सची कारणे

असुरक्षित लैंगिक संबंध, योनी किंवा गुद् मैथून (जर तोंडात जखम किंवा खवखव असेल.) केल्यास संक्रमित जोडीदाराकडून एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

संक्रमित सूई, सीरिंज किंवा ड्रग उपकरणाचा वापर केल्याने सुद्धा एचआयव्ही होऊ शकतो. बहुतांश महिलांना योनी सेक्स दरम्यान एचआयव्ही होतो, मात्र एनल सेक्समुळे सुद्धा एचआयव्ही होऊ शकतो.

महिलांमध्ये एचआयव्हीची लक्षणे

एचआयव्हीची लक्षणे वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळी असतात. एखाद्या महिलेला संसर्ग झाल्यास लक्षणे 2-4 आठवड्यात दिसून येऊ शकतात. नेहमी या लक्षणांना एचआयव्ही ऐवजी एक सामान्य सर्दी किंवा फ्लू समजले जाते. एचआयव्ही संसर्गाच्या सुमारे 80 टक्के व्यक्तींना फ्लू सारखी लक्षणे जाणवतात.

एक्सपर्ट सांगतात की, कधी-कधी लक्षणं प्रकट होण्यास अनेक वर्ष लागतात. हेच कारण आहे की, नेहमी लैंगिक संबंध सुरू करण्यापूर्वी तपासणी करणे महत्वाचे आहे. एचआयव्हीसाठी तपासणी केल्यास महिलांसाठी लवकर उपचारांची आवश्यकता असते आणि व्हायरस पसरण्यापासून रोखण्यास मदत मिळते.

एचआयव्ही आणि गरोदरपणा

मुलाच्या जन्माच्या वेळी आईकडून तिच्या मुलात एवआयव्ही पसरू शकतो. (ज्यास पॅरनटल एचआयव्ही म्हटले जाते) किंवा स्तनपानाच्या माध्यमातून होऊ शकतो. याच कारणामुळे सर्व गरोदर महिलांची गरोदरपणात एचआयव्ही तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

गरोदरपणा दरम्यान अँटीरेट्रोवायरलच्या वापराने एचआयव्ही रोखण्यास मदत होते. जन्मानंतर मुलासाठी सिझेरियन आणि अँटीरेट्रोवायरल थेरेपी सुद्धा आहे.

महिलांमध्ये तीव्र एचआयव्हीची लक्षणे

या टप्प्यात महिलामध्ये सर्वात कॉमन लक्षणात – शरीरीवर रॅशेस होणे, ताप, घशात खवखव, गंभीर डोकेदुखी इत्यादी होते. या टप्प्यात महिलांमध्ये कमी सामान्य लक्षणात लिम्फ नोडमध्ये सूज, जीव घाबरणे, थकवा, तोंडात अल्सर, यीट इन्फेक्शन, वजायनल इन्फेक्शन, रात्री घाम येणे, उलटी, मासपेशीमध्ये वेदना आणि सांधेदुखी ही लक्षणे दिसतात.