World Alzheimer’s Day: मेंदूला तेज बनवतात ‘या’ 5 गोष्टी, डाएटमध्ये अवश्य करा सामील

पोलिसनामा ऑनलाईन – आपला मेंदू शरीराच्या सर्वात महत्वापूर्ण अवयवांपैकी एक आहे. मेंदूवर होणारा परिणाम अत्यंत घातक मानला जातो आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. मेंदूवर होणारा सर्वात सामान्य रोग म्हणजे अल्झायमर. अल्झायमरमध्ये विसरण्याचा आजार होतो. लोकांना जागरूक करण्यासाठी जगभरात दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिन साजरा केला जातो.

आतापर्यंत अल्झायमरवर कोणताही उपचार सापडलेला नाही, पण खाण्याच्या काही गोष्टींनी मेंदूला तेज बनवता येते. हे आहारात सामील करून अल्झायमर टाळता येऊ शकतो. चला या गोष्टी काय आहेत ते जाणून घेऊया.

फॅटी फिश
फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आढळते. ही एक प्रकारची असंपृक्त चरबी असते, जी बीटा अमाइलॉइडची पातळी कमी करतो. बीटा अमाइलॉइडमुळे मेंदूत क्लम्प तयार होतात, ज्यामुळे लोकांना अल्झायमरचा त्रास होतो. आठवड्यातून किमान दोनदा मासे खाण्याचा प्रयत्न करा. सॅल्मन, कॉड आणि ट्यूना खाणे फायदेशीर ठरेल.

आक्रोड
आक्रोडमध्ये भरपूर प्रथिने आणि हेल्दी फॅट असतात. आक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. आक्रोडमध्ये एक प्रकारचे ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते, याला अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (एएलए) देखील म्हणतात. हे रक्तदाब कमी करते आणि रक्तवाहिन्यांचे देखील संरक्षण करते. आक्रोड हृदय आणि मेंदू दोन्हीसाठी चांगले असते.

ब्रॉकली
ब्रॉकोली व्हिटॅमिन केचा एक चांगला स्त्रोत आहे, जो ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी ओळखले जाते. ब्रॉकोलीमध्ये ग्लूकोसिनोलेट्स आढळतात, जे न्यूरोट्रांसमीटर आणि एसिटायलकोलाईनला तुटण्यापासून वाचवते. ग्लुकोसिनोलेट्समुळे मज्जासंस्था ठीक राहते.

अ‍व्होकॅडो
अ‍व्होकॅडो मध्ये मलई आढळते आणि त्यात ओमेगा फॅटी अ‍ॅसिड असते. अ‍व्होकॅडो मध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळते. ओमेगा फॅटी ऍसिड मेंदूच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ई मेंदूच्या पेशींचे संरक्षण करते.

अक्खे दाणे
अख्ख्या दाण्यांमध्ये कर्बोदक, ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन बी आढळते. मेंदूच्या विकास आणि गतीसाठी आवश्यक मानले जाते. कार्ब उर्जा मूड आणि व्यवहार ठीक ठेवते आणि स्मरणशक्तीला गती देते.