सावधान ! हॅकर्सनी फक्त 41 हजारांत विकला 26 कोटी Facebook यूजर्सचा डेटा

पोलीसनामा ऑनलाईन : संशोधकांचे म्हणणे आहे की, हॅकर्सनी 26.7 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा केवळ 500 युरो (सुमारे 41 हजार 500 रुपये) मध्ये विकला. साइबर रिस्क असेसमेंट प्लेटफार्म ‘साइबल’ नुसार विक्री केलेल्या डेटामध्ये वापरकर्त्याचा ईमेल पत्ता, फेसबुक आयडी, जन्म तारीख आणि फोन नंबरचा समावेश आहे. दरम्यान, माहितीनुसार त्यामध्ये कोणत्याही वापरकर्त्याच्या पासवर्डचा समावेश नाही.

ही विक्री साइबलशी संबंधित अश्या संशोधकांनी केली, जे डेटा डाउनलोड आणि सत्यापित करण्यात सक्षम होते. साइबलचे म्हणणे आहे कि, डेटा कसा लीक झाला याची आम्हाला या क्षणी माहिती नाही. तरी थर्ड पार्टी एपीआय (अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) द्वारे डेटा लीक केला गेला असू शकतो. डेटामध्ये वापरकर्त्याचा संवेदनशील तपशील असल्याने सायबर गुन्हेगार त्याचा वापर फिशिंग किंवा स्पॅमिंगसाठी करू शकतात.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 26.7 कोटीहून अधिक फेसबुक यूजरचा डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध असल्याच्या बातम्या आल्या आहेत. वेबसाइटवर लिहिलेल्या ब्लॉग पोस्टच्या मते, हा डेटाबेस ऑनलाइन हॅकर फोरममधून डाउनलोड केला जाऊ शकतो. जेव्हा ही माहिती उघडकीस आली, तेव्हा फेसबुक प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही या प्रकरणाचा विचार करीत आहोत, परंतु असे दिसते आहे की प्रायव्हेट सेटिंग्ज बदलण्यापूर्वी एखाद्याला ही माहिती मिळाली आहे.”

तज्ञांनी फेसबुक वापरकर्त्यांना प्रोफाइलमध्ये त्यांची प्रायव्हेट सेटिंग्ज अधिक मजबूत करण्याचा आणि अनपेक्षित ई-मेलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. यूकेच्या राजकीय सल्लागार कंपनी केंब्रिज एनालिटिका द्वारे 8..7 दशलक्ष यूजर्सचा डेटा वापरल्याबद्दल फेसबुकला आधीपासूनच चौकशीचा सामना करावा लागला आहे. फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) सोशल मीडिया कंपनीला डेटा गोपनीयता उल्लंघनाच्या आरोपाखाली पाच अब्ज डॉलर्स (सुमारे चाळीस हजार कोटी) दंड ठोठावला.