World Athletics Championship | मेडलवीर नीरज चोपडा म्हणाला – प्रत्येक दिवस एकसारखा नसतो, ‘गोल्ड’ची भूक कायम राहील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – World Athletics Championship | | ऑलिंपिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेतील यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नीरजने 88.13 मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदकावर निशाणा साधला. त्याचवेळी विजयानंतर नीरज चोप्रा म्हणाला, वार्‍यामुळे थोडा त्रास झाला. पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. स्पर्धा कठीण होती, खुपकाही शिकायला मिळाले. (World Athletics Championship)

 

नीरज चोप्रा म्हणाला की, मी नेहमीच म्हणत आलो की प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. पीटर्स चांगला खेळ केला, आज पीटर्सचा दिवस होता. ऑलिम्पिकबद्दल बोलायचे झाले तर पीटर्स अंतिम फेरीतही पोहोचू शकला नाही. प्रत्येक खेळाडूसाठी हे खूप आव्हानात्मक असते, प्रत्येक खेळाडूचे शरीरही वेगळे असते. कोणाचीही कधीही तुलना होऊ शकत नाही. सगळ्यांनी अथक प्रयत्न केले. आम्हीही खूप प्रयत्न केले. खडतर स्पर्धा होती. आजच्या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाले. (World Athletics Championship)

 

विजयानंतर नीरज चोप्रा म्हणाला की, सिल्वरचा खूप आनंद आहे. वेगळी रणनीती नसल्याचे ते म्हणाले.
क्वालिफिकेशन राऊंडमध्ये चांगले थ्रो झाले. प्रत्येक दिवस वेगळा असतो. आपण विचार करतो तसे निकाल नेहमीच मिळत नाहीत,
परंतु ही एक कठीण लढत होती, आम्ही कमबॅक केले आणि सिल्व्हर जिंकले.

नीरज चोप्रा म्हणाला की, अँडरसन पीटर्सचा थ्रो खूप चांगला होता. आजची परिस्थिती माझ्यासाठी वेगळी होती.
पण मला वाटले की थ्रो ठीक आहे, मी माझ्या थ्रोने खूश आहे. तो म्हणाला, प्रत्येक वेळी गोल्ड मेडल येऊ शकत नाही.
खेळात नेहमीच चढ-उतार असू शकतात. मी नेहमीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.

 

नीरज म्हणाला, आजच्या खेळाने खूप काही शिकवले आहे. वारा विरुद्ध होता. याचाही परिणाम झाला.
थ्रो होईल असे कुठेतरी वाटत होते, पण पदक जिंकल्याचा आनंद आहे. भविष्यात अधिक मेहनत घेईन.

 

Web Title :- World Athletics Championship | drought ends world athletics neeraj chopra won silver glad to be back in the game

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Sanjay Raut | फडणवीसांकडून ‘लाउडस्पीकर’ असा उल्लेख; संजय राऊत म्हणाले – ‘काय पिपाण्या, सनई चौघडे….’

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…