World Bank Revises Indias GDP Forecast | भारतीय अर्थव्यवस्था सुसाट धावणार, GDP बाबत आनंदवार्ता; महागाई मात्र…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – World Bank Revises Indias GDP Forecast | कोरोना महामारीमुळे झालेली टाळेबंदी आणि त्यानंतर सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट उभे आहे, तर अनेक देश महागाईमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. असे असताना भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian Economy) स्वतःचा समतोल बऱ्यापैकी साधला आहे. भारतात आर्थिक विकासाचा दर अपेक्षेसारखा जास्त नसला तरी भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा चांगल्या स्थितीत होती आणि भारतात महागाई दर स्वीकार्य प्रमाणात वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अजून एक चांगली बातमी आली आहे. (World Bank Revises Indias GDP Forecast)

 

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) भारताची अर्थव्यवस्था ६.९ टक्के दराने वाढेल. यापूर्वी भारताची अर्थव्यवस्थेचा दर ६.५ टक्केने वाढण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला होता. रशिया-युक्रेन युद्ध आणि जगातील अनेक देशांनी लादलेल्या कडक आर्थिक धोरणांमुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जागतिक बँकेने भारताचा विकासदराचा अंदाज ६.५ टक्क्यांवर आणला होता, तर यापूर्वीचा अंदाज ६.१ टक्के होता; पण आता जागतिक बँकेने पुन्हा एकदा बदल करून त्यात वाढ केली आहे.

 

देशातील वस्तूंच्या चढ्या किमती आणि देशाचे चलनविषयक धोरण लक्षात घेऊन देशाच्या एकूण उत्पन्नाचा (GDP) हा अंदाज लावण्यात आला आहे.
जागतिक बँक म्हणते, ‘भारताची अर्थव्यवस्था जागतिक धक्क्यांना चांगल्या प्रकारे हाताळत आहे.
या वर्षी सरासरी किरकोळ महागाई ७.१ टक्के असू शकते.’ मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे, हा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) समाधानकारक श्रेणीपेक्षा १ टक्क्याने जास्त आहे. रिझर्व्ह बँकेची महागाईची समाधानकारक श्रेणी ४ टक्क्यांची असून, त्यात २ टक्केची वाढ किंवा घट रिझर्व्ह बँकेला मान्य असते.

आर्थिक विकासाचा दर आणि महागाईचा दर या दोन वेगळ्या संकल्पना आहेत.
आर्थिक विकास मोजताना देशाच्या एकूण उत्पन्नात किती टक्क्याने वाढ होत आहे हे पहिले जाते,
तर महागाई दरात एखाद्या वस्तूची ग्राहकाला द्याव्या लागलेल्या किमतीतील बदल ग्राह्य धरला जातो.

 

Web Title :- World Bank Revises Indias GDP Forecast | world bank revises indias gdp forecast predicts to grow at 6 9 percent in fy23

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार