World Blood Donor Day 2024 | रक्तदान करताना ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, समज-गैरसमज जाणून घ्या

नवी दिल्ली : World Blood Donor Day 2024 | आपण केलेल्या रक्तदानाने कोणाचेतरी प्राण वाचवतात. तज्ज्ञ सांगतात की रक्तदानामुळे कोणतेही नुकसान होत नाही, उलट त्याचे अनेक फायदे आहेत. दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने रक्तदान कोण करू शकते? त्यासंबंधी कोणकोणते समज-गैरसमज आहेत? आवश्यक ती खबरदारी काय असावी? ते जाणून घेऊया…(World Blood Donor Day 2024)

हे लोक करू शकतात रक्तदान

  • कोणताही आजार नसलेले निरोगी लोक.
  • ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक नियमितपणे रक्तदान करू शकतात.
  • रक्त पातळ करणारे औषध घेत असल्या रक्तदान टाळावे.
  • कावीळ झाली असल्यास रक्तदान करू नये.
  • हिपॅटायटीस बी किंवा सी किंवा अ‍ॅनिमियाने ग्रस्त लोकांनी रक्तदान टाळावे.

हे आहेत समज-गैरसमज
एक युनिट रक्त दान केल्यावर त्याचा शरीरावर विशेष परिणाम होत नाही. अशक्तपणा येत नाही. रक्ताचे एक युनिट म्हणजे सुमारे ३००-३५० मिली रक्त एका वेळी देता येते. एक युनिट रक्तदानानंतर पुढील दोन-तीन दिवसांत शरीरा त्याची भरपाई करते. रक्तदान केल्यावर कोणताही संसर्ग होत नाही. रक्तदानातील सर्व वस्तू डिस्पोजेबल असतात, त्यामुळे संसर्ग होत नाही.

रक्तदान करताना हे लक्षात ठेवा

  • हायड्रेटेड राहा.
  • रिकाम्या पोटी रक्तदान करू नका.
  • रक्तदानानंतर पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि सकस आहार घ्या.
  • थोडा अशक्तपणा वाटल्यास अर्धा तास विश्रांती घ्या.
  • रक्तदानानंतर साधारणपणे कोणतीही गंभीर लक्षणे किंवा धोका नसतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar-EVM Machine Pooja | रुपाली चाकणकरांची ईव्हीएम पूजा नडली; मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Ranjangaon Ganpati Pune Crime News | ‘ज्वेलर्स’च्या दुकानाचे शटर उचकटून 16 लाख 25 हजारांचे दागिने चोरीला; रांजणगाव गणपती येथील घटना

Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मृत तरुण-तरुणी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न’ माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Bibvewadi Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक परिसरातील रस्ते भविष्यात होणार मृत्यूचे जाळे? वाढत्या जड वाहतुकीमुळे तीव्र उतारावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेउन प्रवास (Videos)