World Cancer Day 2022 | पुरुषांमध्ये ‘ही’ 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World cancer day 2022) साजरा केला जातो. या गंभीर आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, लक्षणे ओळखण्यासाठी आणि प्रतिबंध कसा करावा हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी लाखो लोक केवळ कर्करोगाने मरतात. कर्करोगाचा उपचार दीर्घकाळ चालतो आणि अनेक लोक याच्याशी आपल्या जीवनाची लढाई हरतात. (World Cancer Day 2022)

 

सुरुवातीच्या टप्प्यातच त्याची लक्षणे ओळखून तो गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकते. पुरुषांमधील कर्करोगासंबंधित कोणत्या लक्षणांकडे (Cancer Symptoms in Men) अजिबात दुर्लक्ष करू नये, ते जाणून घेवूयात.

 

1. लघवीची समस्या (Urinary problems)
काही पुरुषांमध्ये, लघवीशी संबंधित समस्या वयानुसार वाढते. तुम्हाला रात्री वारंवार बाथरूमला जावे लागते. काही वेळा लघवीवर नियंत्रण ठेवणेही शक्य होत नाही. लघवी करताना जळजळ होणे आणि कधीकधी त्यातून रक्तही येते. प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे ही लक्षणे जाणवतात.

हा प्रोस्टेट कर्करोग देखील असू शकतो. अशी कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. ते तुमच्या रक्ताची किंवा प्रोस्टेटची चाचणी करू शकतात.

 

2. त्वचेत बदल (Skin changes)
जर तुमच्या त्वचेवर तीळ किंवा चामखीळ असेल तर त्याचा आकार किंवा रंग बदलू शकतो. त्वचेवर काही डाग अचानक दिसू शकतात. असे काही दिसल्यास, कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय, डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. तुमचे डॉक्टर बायोप्सीची शिफारस करू शकतात.

 

3. गिळण्याताना त्रास होणे (Difficulty swallowing)
कर्करोगामुळे, काही लोकांना वेळोवेळी गिळण्याचा त्रास होतो. जर तुमचे वजन अचानक कमी होत असेल किंवा गिळताना त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटा. ते घसा किंवा पोटाच्या कर्करोगाची चाचणी करू शकतात. घशाची तपासणी करण्यासाठी तुमचा बेरियम एक्स-रे केला जाऊ शकतो.

4. छातीत जळजळ (Heartburn)
जर तुम्हाला सातत्याने छातीत जळजळ होत असेल आणि आहार बदलूनही ही जळजळ कमी होत नसेल, तर तुम्ही ते गांभीर्याने घेतले पाहिजे. छातीत तीव्र जळजळ पोट किंवा घशाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकते. त्यामुळे वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

5. तोंडात बदल (Changes in the mouth)
तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा तंबाखू खात असाल तर तुम्हाला तोंडाचा कर्करोग (Mouth cancer) होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे, तोंडावर आणि ओठांवर पांढरे, लाल, तपकिरी किंवा पिवळे डाग दिसू शकतात. तुम्हाला तोंडात फोड देखील जाणवू शकतो जो अल्सरसारखा दिसतो. डॉक्टर तुम्हाला टेस्ट आणि उपचारांचा सल्ला देऊ शकतात.

 

6. जलद वजन कमी होणे (Rapid weight loss)
जर तुमचे वजन कोणत्याही प्रयत्नाशिवाय झपाट्याने कमी होत असेल तर ते तणाव किंवा थायरॉईडमुळे असू शकते.
या समस्यांशिवायही, जर तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल तर ते स्वादुपिंड, पोट किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
रक्त तपासणीद्वारे याबाबत योग्य माहिती मिळू शकते.

 

7. टेस्टिकल्समध्ये बदल (Changes in the testicles)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टेस्टिकल म्हणजेच अंडकोषात गाठ, जडपणा किंवा कोणताही बदल दिसल्यास उशीर करू नये.
योग्य वेळी निदान झाल्यास त्यावर उपचारही होऊ शकतात.
हे शोधण्यासाठी, डॉक्टर तुमची रक्त तपासणी आणि अल्ट्रासाऊंड करू शकतात. (World Cancer Day 2022)

 

8. छाती बदल (Changes in the chest)
छातीत कोणत्याही प्रकारची गाठ जाणवणे हे पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
सहसा पुरुष स्तनाशी संबंधित या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे याचे निदान खुप पुढच्या स्टेजमध्ये होते.
डॉक्टर म्हणतात की पुरुषांनी गाठीशी संबंधित कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

9. थकवा (Fatigue)
अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये खूप जास्त थकवा येतो. पूर्ण विश्रांती घेऊनही हा थकवा जात नाही.
हा थकवा खूप कामानंतरच्या थकव्यापेक्षा वेगळा असतो. तुम्हालाही असाच थकवा जाणवत असेल
आणि त्यामुळे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे करता येत नसतील, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

10. खुप जास्त खोकला येणे (Excessive coughing)
जास्त खोकला हे सहसा कर्करोगाचे लक्षण नाही आणि खोकला 3-4 आठवड्यात आपोआप बरा होतो.
मात्र, जर तुमचा खोकला 4 आठवड्यानंतरही कायम राहिला आणि त्यासोबत तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत
असेल तर ते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
यासाठी डॉक्टर तुमचा एक्स-रे करू शकतात.

 

 

Web Title :- World Cancer Day 2022 | world cancer day 2022 cancer symptoms men should not ignore prostate skin mouth lung cancer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

APY | रू. 42 महिना जमा करून रू.1,000 महिना मिळवणार्‍यांची आहे मोठी रांग, जाणून घ्या योजना

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,252 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nashik Crime | धक्कादायक ! नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांची सुपारी देऊन हत्या झाल्याचं उघडकीस आल्यानं प्रचंड खळबळ