World Cancer Day 2022 | कॅन्सरचा धोका वाढवू शकतात ‘या’ 5 गोष्टी, आजपासूनच सेवन करा बंद, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day 2022) 4 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात 1933 मध्ये झाली. कर्करोगाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. या दिवशी अनेक सरकारी आणि खाजगी संस्था कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी शिबिरे, व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित करतात. (World Cancer Day 2022)

 

जगभरात दरवर्षी हजारो लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्चनुसार, असे काही पदार्थ आहेत जे दररोज खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. या पदार्थांचे सेवन बंद केल्यास कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. तुम्हालाही कर्करोगापासून दूर राहायचे असेल आणि त्याचा धोका कमी करायचा असेल, तर खाली नमूद केलेले पदार्थ खाणे बंद करा.

 

1. तळलेले पदार्थ (Fried Foods)
पदार्थ तळण्यासाठी, तेल मोठ्या आचेवर गरम केले जाते. यामुळे अ‍ॅक्रिलामाईड नावाचे संयुग तयार होऊ लागते. संशोधनानुसार, अ‍ॅक्रिलामाईड कंपाऊंड डीएनएचे नुकसान करतो, ज्यामुळे कर्करोगासह इतर रोगांचा धोका वाढतो.

 

काही लोकांना तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. असे अन्न खाल्ल्याने टाइप 2 मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. यामुळे तणाव आणि शरीरात सूज वाढू शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

2. जास्त शिजवलेले पदार्थ (Overcooked Foods)
भारतीय घरांमध्ये अन्न जास्त शिजवण्याची सवय आहे, ज्यामुळे त्यातील सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे नष्ट होतात. परंतु त्याच वेळी काही लोक ते अन्न उच्च आचेवर किंवा थेट आगीत शिजवतात आणि नंतर ते खातात. असे अन्न खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

 

2020 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, उच्च उष्णतेवर मांसाहारी पदार्थ शिजवल्याने अशी अनेक संयुगे तयार होतात, ज्यामुळे पेशींच्या डीएनएमध्ये बदल होतो आणि कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे थेट उच्च आचेवर शिजवण्याऐवजी प्रेशर कुकर वापरा. याशिवाय तुम्ही मंद आचेवर भाजू किंवा बेक करू शकता.

 

 

3. साखरयुक्त आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट (Sugary And Refined Carbohydrates)
गोड आणि रिफाईंड फूड प्रॉडक्ट अप्रत्यक्षपणे कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
या पदार्थांमध्ये साखरयुक्त पेये, बेक केलेले अन्न, पांढरा पास्ता, पांढरा ब्रेड, पांढरा तांदूळ इत्यादींचा समावेश आहे.
याशिवाय स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ल्याने मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोकाही वाढू शकतो.
2020 च्या अभ्यासानुसार, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या स्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. (World Cancer Day 2022)

 

2019 च्या रिव्ह्यूनुसार, टाइप 2 मधुमेहाने ओव्हरी, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या वाढीचा धोका वाढला होता.
साखर आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असलेल्या उत्पादनांमध्ये देखील साखरेचे प्रमाण जास्त असते,
जे मलाशयाच्या कर्करोगाला उत्तेजन देऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.

Advt.

4. दारू (Alcohol)
अल्कोहोलच्या सेवनामुळे लिव्हर अल्कोहोलचे एसीटाल्डिहाइड, एका कार्सिनोजेनिक संयुगात विघटन करते.
त्यामुळे डीएनएचे नुकसान होते आणि इम्युनिटीच्या कार्यातही समस्या येऊ लागतात.
यामुळे काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. अल्कोहोल प्यायल्याने शरीराचे इतरही अनेक नुकसान होते, त्यामुळे त्याचे सेवन करू नये.

 

5. प्रक्रिया केलेले मांस (Processed Meat)
प्रक्रिया केलेले मांस तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धती कॅन्सर निर्माण करणारे तत्व म्हणजे
कार्सिनोजेन तयार करू शकतात, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
त्यामुळे प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळावे. 2019 मध्ये झालेल्या संशोधनानुसार,
प्रक्रिया केलेले मांस हे मलाशयाच्या कर्करोगाचे मुख्य कारणआहे आणि इतर अभ्यासानुसार,
प्रक्रिया केलेले मांस पोटाच्या कर्करोगाचा देखील धोका वाढवू शकते.

याशिवाय 2018 च्या रिव्ह्यूमध्ये आढळून आले होते की, ज्या महिला जास्त प्रक्रिया केलेले मांस खातात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त होता.

 

Web Title :- World Cancer Day 2022 | world cancer day 2022 foods that may increase risk of cancer cancerous cells fried foods alcohol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

World Cancer Day 2022 | पुरुषांमध्ये ‘ही’ 10 लक्षणे असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

 

APY | रू. 42 महिना जमा करून रू.1,000 महिना मिळवणार्‍यांची आहे मोठी रांग, जाणून घ्या योजना

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,252 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी