कौटुंबिक वादामुळं P.V. सिंधू लंडनला निघून गेली ?

पोलीसनामा ऑनलाइन – भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं ऑलिम्पिक तयारीसाठी सुरू असलेलं राष्ट्रीय शिबीर अर्ध्यावर सोडलं आहे. सिंधू थेट लंडनमध्ये दाखल झाली आहे. शिबीर अर्ध्यावर सोडण्याच्या तिच्या निर्णयावर भारतीय बॅडमिंटन जगात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ती तंदुरुस्ती आणि न्युट्रिशनसाठी युकेला गेल्याचं इंस्टा अकाऊंटवर म्हटलं आहे. मागच्या 10 दिवसांपासू सिंधू युकेमध्ये आसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा असलेल्या सिंधून राष्ट्रीय शिबीर अर्ध्यावर सोडणं आश्चर्यकारक आहेच. परंतु सिंधू थेट परदेशात असताना तिचे पालकही तिच्यासोबत नाहीयेत. युकेमध्ये तज्ज्ञांची समिती तिच्यावर लक्ष ठेवून असणार आहे. 2 महिने ती युकेमध्ये थांबेल असा अंदाज आहे.

सिंधू लंडनला रवाना झाली त्यावेळी ती चिडलेली होती. कौटुंबिक तणाव सुद्धा एक कारण आहे असं एका इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे. हैदराबाद सोडण्यापूर्वी सिंधूनं गोपीचंद अ‍ॅकेडमीतील प्रशिक्षकांना पुढच्या 8 ते 10 आठवडे भारतात परणार नसल्याचं सांगितलं आहे.

सिंधूचे वडिल पी व्ही रामाना हे फोन उचलत नाहीयेत. तसंच मेसेजला प्रतिसाद देत नाहीत. काही गोष्टींमुळं सिंधू निराश आहे. समजूत घालून तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं सूत्रांनी सांगितलं आहे.

सिंधू लवकर भारतात परतण्याची शक्यता कमी आहे. जीवनाच्या या टप्प्यावर तिला तिच्या पद्धतीनं आयुष्य जगायचं आहे. तिला स्वत:वर कोणाचं नियंत्रण नको आहे. तिला थोडं स्वातंत्र्य हवं आहे. या ब्रेकमध्ये तिला आनंद मिळेल आणि ती परत येईल अशी अपेक्षाही सूत्रांनी व्यक्त केली आहे.