‘या’ देशांमध्ये 1 लिटर पेट्रोल 10 पैशापेक्षा कमी रुपयाला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक स्तरावर कच्या तेलांच्या किमतींमध्ये सतत घट होत आहे. कच्च्या तेलांचे भाव कमी जास्त झाल्यानंतर पेट्रोल डिझेल च्या किमतींमध्ये मोठे बदल दिसून येतात. परंतु सध्या त्याचा भारतात जास्त काही परिणाम दिसून येत नाहीये.

जाणून घ्या, जगातील काही असे देश जेथे पेट्रोल अतिशय स्वस्त दराने विकले जाते. अनेक देशांमध्ये भारतापेक्षा अतिशय स्वस्त दराने पेट्रोल विकले जाते. पाहुयात जगातील असे १० देश, जिथे पेट्रोलच्या किमती अतिशय स्वस्त आहे.

१०. जगभरात स्वस्त तेल विकणार्‍या १० देशांच्या यादीमध्ये अझरबैजान या देशाचे नाव १० क्रमांकावर आहे. या देशात पेट्रोलची किंमत प्रति लिटर ३३.८७ रुपये आहे. भारतापेक्षा तब्बल ४०.९९ रुपयांनी स्वस्त आहे.

९. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिका खंडातील अंगोला हा देश ९ व्या क्रमांकावर आहे. येथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर ३१.९० रुपये आहे. भारतापेक्षा पेट्रोल तब्बल ४२.९६ रुपयांनी स्वस्त आहे.

८. अतिशय स्वस्त दराने पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये तुर्कमेनिस्तानचे ८ व्या क्रमांकावर नाव आहे. येथे १ लिटर पेट्रोलची किंमत ३०. ८७ रुपये आहे. भारतापेक्षा तब्बल ४३.९९ रुपयांनी स्वस्त आहे.

७. या यादीमध्ये नायजेरियाचे नाव ७ व्या क्रमांकावर आहे. येथे भारतापेक्षा पेट्रोल ४६.०१ रुपये प्रति लीटर दराने स्वस्त आहे. यथे १ लिटर ची किंमत २८.८५ रुपये आहे.

६. जगातील स्वस्त पेट्रोल विक्री करणाऱ्या देशांमध्ये इराण हा देश ६ व्या क्रमांकावर आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत २५.९९ रुपये आहे.

५. स्वस्त पेट्रोल विक्री करणार्‍या देशांमध्ये अल्जेरियाचे नाव ५ व्या क्रमांकावर आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत २५.१२ रुपये आहे.

४. कुवेतचे नाव ४ थ्या क्रमांकावर आहे. येथे एक लिटर पेट्रोल २४.९१ रुपये आहे. जी भारतापेक्षा प्रति लीटर ४८.९५ रुपयांनी स्वस्त आहे.

३. स्वस्त पेट्रोल विक्री करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये ३ ऱ्या क्रमांकावर सुदान या देशाचे नाव आहे. सुदानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त ९. ८७ रुपये आहे. जी भारतापेक्षा प्रति लिटर ६४.९९ रुपयांनी स्वस्त आहे.

२. सर्वात स्वस्त पेट्रोल विक्रीच्या बाबतीत क्युबाचे २ रे स्थान आहे. ०२ सप्टेंबरपर्यंत एक लिटर पेट्रोलची किंमत ६.४० रुपये होती. जी भारतापेक्षा ६८ रुपयांनी स्वस्त आहे.

१. या यादीमध्ये व्हेनेझुएला १ ल्या क्रमांकावर आहे. या देशातील पेट्रोलच्या किमतीचा आपण विचारही करू शकणार नाही एवढी कमी किंमत आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत ०.०४ पैसे आहे. भारतापेक्षा तब्बल ७४.८२ रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त –