Coronavirus In Pakistan : चीननं गंडवलं, टॉप क्वॉलिटीचे सांगून अंडरगारमेंट्सचे विकले ‘मास्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस चीनमधून संपूर्ण जगात पसरला. या दरम्यान, पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यानुसार त्यांच्या जवळील मित्र राष्ट्र चीनने हाय क्वालिटी N-95 मास्कच्या नावे धोका दिला आहे. पाकिस्तानमध्ये सिंधच्या सरकारने चीनकडून कोट्यावधीच्या संख्येने एन-95 मास्क खरेदी केले होते, परंतु जेव्हा हे पॅकेट्स खोलण्यात आले तेव्हा कळाले की हे अंडरगारमेंट्सची मास्क त्यांना विकण्यात आले आहेत. यानंतर पाकिस्तानकडे हे मास्क लोकांना विकण्याशिवाय कोणताही मार्ग राहिला नाही. ही माहिती समोर आल्यानंतर इमरान खान सरकार आणि विशेष करुन सिंध प्रांत सरकारचे हसू झाले आहे.

पाकिस्तानमधून ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली की पाकिस्तानने या मास्कचा उपयोग करता कामा नये कारण हे इस्लामच्या विरोधात आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की चीन आणि पाकिस्तान खूप चांगले मित्र आहे आणि चीनकडून जे काही मिळालं ते पाकिस्तानने गिफ्ट म्हणून ठेवून घेतले. पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवर या बातमी सुरु आहेत की चीनने चूना लावला.

पाकिस्तानात हाताबाहेर जात आहे परिस्थिती
बाकी देशांप्रमाणे पाकिस्तानात देखील कोरोना पसरत आहे परंतु जागरुकतेची कमी, सरकारचा नाकरतेपणा आणि रुग्णालयांची वाईट परिस्थिती यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे परंतु नुकताच एक व्हिडिओ समोर आला त्यातून स्पष्ट झाले की लोक मोठ्या संख्येने मस्जिदीत नमाज पठनासाठी जमा होत आहे आणि पोलिसांनी त्यांना रोखल्यास ते पोलिसांवर हल्ले करत आहेत.