World Coronavirus : जगभरात 24 तासांत समोर आली 6 लाख ‘कोरोना’ प्रकरणे, 10 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. जगातील 218 देशांमध्ये पसरलेल्या कोरोनाची गेल्या 24 तासांत जगभरात 6 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर 10 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे अमेरिका सर्वाधिक प्रभावित असल्याचे दिसते. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचा 13,450,712 लोकांना संसर्ग झाला आहे, तर 2,71,025 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार जगभरात कोरोना संसर्गाची 6 कोटी 19 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर आतापर्यंत 14 लाख 48 हजार लोक मरण पावले आहेत. अधिक माहिती म्हणजे आत्तापर्यंत 4 कोटी 27 लाखांहून अधिक लोक कोरोना संसर्गामुळे बरे झाले आहेत, तर 1 कोटी 77 लाखांहून अधिक लोकांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या कोरोनाचा अमेरिकेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. गेल्या 24 तासांविषयी बघितले तर कोरोनाची 60 हजारांहून अधिक प्रकरणे तेथे नोंदली गेली आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो, भारतात कोरोनाचे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर असून, तेथे गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33 हजार नवीन रुग्ण समोर आले आहेत.

भारतात 93 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग
आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाची 13,450,712 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 2,71,025 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे भारतात कोरोनाचा 93,51,224 लोकांना संसर्ग झाला आहे, तर 1,36,238 लोक मरण पावले आहेत. ब्राझीलमध्ये कोरोनाची 62,38,350 प्रकरणे समोर आली आहेत, तर 1,71,998 लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियामध्ये कोरोनाची 2,215,533 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 38,558 लोकांचा बळी गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची 21,96,119 प्रकरणे आढळली आहेत तर 51,914 लोकांचा मृत्यू झाला आहे.

You might also like