जगात आतापर्यंत 9.24 लाख ‘कोरोना’ रूग्णांचा मृत्यू, 4 देशांमध्ये 52% जणांचा गेला जीव, वाचा टॉप-10 संक्रमित देशांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना महामारीचा कहर अजूनही थांबलेला नाही. प्रत्येक दिवशी सुमारे तीन लाख नवीन प्रकरणे समोर येत आहेत. सुमारे तीन कोटी लोक कोरोना महामारीने संक्रमित झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यापैकी दोन कोटीपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. मागील 24 तासात जगात 2.81 लाखपेक्षा जास्त नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि 4961 लोकांचा जीव गेला आहे.

जगभरात आतापर्यंत 2 कोटी 89 लाख लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. यापैकी 9 लाख 24 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 2 कोटी 8 लाखांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जगात 72 लाखांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, म्हणजे सध्या इतके लोक हॉस्पीटलमध्ये दाखल आहेत.

कोरोनाने सर्वाधिक प्रभावित देश
अमेरिका, ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोना प्रकरणे आणि मृत्यूंच्या आकड्यात घट झाली आहे. भारतच एकमेव देश आहे जेथे कोरोना महामारी वगाने वाढत आहे. मात्र, कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. येथे आतापर्यंत 66 लाख 76 हजारपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत मागील 24 तासात 38 हजारपेक्षा जास्त नव्या केस आल्या आहेत. तर ब्राझीलमध्ये 24 तासात 31 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. जगात कोरोना प्रकरणांमध्ये नंबर-2 स्थानावर पोहचलेल्या भारतात दरदिवशी सर्वात जास्त केस येत आहेत.

अमेरिका : केस- 6,676,099, मृत्यू – 198,124
भारत : केस- 4,751,788, मृत्यू – 78,614
ब्राझील : केस- 4,315,858, मृत्यू – 131,274
रशिया : केस- 1,057,362, मृत्यू – 18,484
पेरू: केस- 722,832, मृत्यू – 30,593
कोलंबिया : केस- 708,964, मृत्यू – 22,734
मेक्सिको : केस- 658,299, मृत्यू – 70,183
साउथ अफ्रीका : केस – 648,214, मृत्यू – 15,427
स्पेन : केस- 576,697, मृत्यू – 29,747
अर्जेंटीना : केस- 546,481, मृत्यू – 11,263

23 देशांमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना संक्रमित
जगातील 23 देशांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. यामध्ये इराण, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरब, इटली, जर्मनी आणि बांगलादेशचा सुद्धा समावेश आहे. जगात 60 टक्के लोकांचा जीव केवळ 6 देशांमध्ये गेला आहे. हे देश आहेत – अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, भारत, ब्रिटन, इटली. जगातील चार देशामध्ये (अमेरिका, ब्राझील, मेक्सिको, भारत) 70 हजारपेक्षा जास्त संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. या चार देशांमध्ये एकुण 4.78 लाख लोकांचा जीव गेला आहे, ही संख्या जगाच्या एकुण मृत्यूंच्या 52 टक्के आहे.

भारत जगात सर्वात जास्त संक्रमितांच्या प्रकरणात दुसर्‍या नंबरवर आहे. एवढेच नव्हे, तर सर्वात जास्त मृत्यूंच्या बाबतीत भारत तिसर्‍या नंबरवर आहे. सोबतच भारत असा दुसरा देश आहे, जेथे सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.