क्रिकेटर केदार जाधव ‘फिट’ न झाल्यास ‘या’पैकी एकाला मिळू शकते संधी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – क्रिकेट विश्वचषक २०१९ ची तयारी सर्वच संघांनी जोरदार सुरु केली आहे. ३० मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. अशातच एका आयपीयल सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला दुखापत झाली. यामुळे त्याला उर्वरित सामन्यांना मुकावे लागले आहे.

भारताचा पहिला सामना ५ जुन रोजी दक्षिण आफ्रिकेशी आहे. त्यानंतर १६ जून रोजी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आहे. त्यामुळे केदारला झालेली दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच जर तो फिट नाही झाला तर कोणत्या खेळाडूला त्याच्या जागी संधी दिली जाईल याविषयी चर्चा सुरु आहे. जर केदार जाधव फिट झाला तर त्याला फिटनेस चाचणी द्यावी लागेल आणि जर तो त्या चाचणीत पास नाही झाला तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश संघात केला जाऊ शकतो.

या पाच खेळाडूंचा केला जाऊ शकतो विचार –

रिषभ पंत –
सामने :५
धावा :९३
सरासरी : २३. २

अंबाती रायडू –
सामने :५५
धावा :१६९४
सरासरी : ४७

मनीष पांडे –
सामने :२३
धावा :४४०
सरासरी :३६

शुभमन गिल –
सामने :२
धावा :१६
सरासरी :८

श्रेयस अय्यर –
सामने :६
धावा :२१०
सरासरी :४२

विश्वचषकासाठी निवड झालेला भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार ), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल, महेंद्रसिंग धोनी, विजय शंकर, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, केदार जाधव, हार्दिक पंड्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like