World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था – वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंची ऑस्ट्रेलियन टीम जाहीर करण्यातत आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयाने आश्चर्य़ व्यक्त केले जात आहे. ऑस्ट्रेलियन निवड समितीने पीटर हॅण्डसकोम्ब आणि जोश हेझलवूडला टीममध्ये स्थान न दिल्याने सर्वांनाच अनपेक्षित धक्का लागला आहे.

ऑस्ट्रेलियन टीममध्ये स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला स्थान देण्यात आले आहे. बॉलसोबत छेडछाड केल्या प्रकरणी या दोघांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर बंदी उठवल्यानंतर त्यांना टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.

अशी आहे ऑस्ट्रेलियन टीम
एरॉन फिंच (कॅप्टन)
जेसन बेहरनडॉर्फ
एलेक्स कॅरी (विकेटकीपर)
नॅथन कॉल्टर-नाइल
पॅट कमिन्स
उस्मान ख्वाजा
नेथन लॉयन
शॉन मार्श
ग्लेन मॅक्सवेल
झाय रिचर्डसन
स्टीव्ह स्मिथ
मिचेल स्टार्क
मार्कस स्टॉयनिस
डेव्हि़ड वॉर्नर
एडम झॅम्पा
ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगची धुरा ही पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन कॉल्टर-नाइल, जॉय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फ यांच्यावर असणार आहे. तसेच फिरकीची बाजू नेथन लॉयन आणि एडम झॅम्पा यांच्याकडे असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us