‘किंग’ कोहलीच्या ‘या’ फोटोवरून चाहत्यांचा आयसीसीवर ‘निशाणा’ : म्हणाले, आयसीसी आहे कि…

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ या स्पर्धेत विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे. भारतीय संघाने देखील विजयी सुरुवात करताना चांगला खेळ केला.

दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने आपल्या या प्रवासाची सुरुवात केली आहे. मात्र या सामन्यात भारतीय यष्टिरकसहक महेंद्रसिंग धोनी याच्या ग्लोव्हज वरून झालेल्या वादानंतर आता नवीन वाद समोर आला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या एका फोटोवरून हा वाद उद्भवला आहे.

आयसीसीने विराट कोहलीचा एक फोटो राजाच्या रूपात ट्विटरवर पोस्ट केला होता. या फोटोत तो राजाच्या रूपात दिसत असून त्याच्या एका हातात बॅट आणि दुसऱ्या हातात बॉल आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या आधी हा फोटो आयसीसीने ट्विट केला होता. मात्र हा फोटो टाकल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही चाहत्यांनी याला चांगले म्हटले तर काहींनी आयसीसीवर टीका करताना त्यांची बीसीसीआयबरोबर तुलना केली.

यावर टीका करताना काही जणांनी म्हटले कि, या स्पर्धेत फक्त भारतीय संघ एकटा नाहीतर १० संघानी सहभाग घेतला आहे. त्यामुळे कोहलीचा फोटो टाकून त्यांना काय दर्शवायचे आहे. तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला आहे. तर काहींनी आयसीसी आहे कि इंडियन क्रिकेट कौन्सिल आहे असे म्हटले आहे.