ICC World Cup 2019 : …म्हणून भारतीय संघाचं न्युझीलँड संघासमोर ‘लोटांगण’, भारतीय संघाची ‘१८’ धावांनी ‘हार’

लंडन : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्युझीलँडच्या सामन्यात भारताला मोठा संघर्ष करावा लागून देखील हार स्वीकारावी लागली आहे. यामुळे भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना न्युझीलँड विरोधात होता. भारताला ५० व्या ओव्हर मध्ये २४ रनांची आवश्यकता होती. मात्र त्या धावा जमवण्यात भारताला अपयश आले. त्यामुळे भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारत आता वर्ल्डकप मधून बाहेर पडला आहे.

शेवटच्या काही ओव्हर मध्ये जडेजा आणि धोनीने संघर्ष केला. मात्र त्यात त्याचा संघाला फायदा झाला नाही. जडेजाने शानदार खेळी करत संघाचा डाव संभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो देखील अर्ध शतक केल्यानंतर बाद झाला. त्याला धोनीने साथ दिली मात्र तो देखील ४९ धावा करुन रन आऊट झाला.

शेवटच्या क्षणाला भारताला हे दोन मोठे धक्के बसले. या दोघांच्या खेळीने भारतीय संघ सावरेल आणि सामना जिंकेल अशी आशा चाहत्यांच्या मनात होती, मात्र ती आशा फोल ठरली.

रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहूल फेल –
सुरुवातीलाच भारताचा संघ डळमळला होता. रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहूल हे सामन्यात फेल गेल्याने सामना सुरुवातीपासूनच कोसळला. भारतीय क्रिकेट चाहत्यांना यांच्याकडून सर्वात अधिक अपेक्षा होती. मात्र आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटची जादू चालली नाही. तर कोहली सुद्धा मैदानात उतरताच लगेच मागे फिरला. के.एल.राहूलला देखील दमदार कामगिरी निभावता आली नाही. तो ही मैदानात येऊन काही बॉल खेळून बाद झाला.

भारताचा संघ पहिल्यापासूनच डळमळल्यामुळे भारताच्या आजच्या सामन्याच्या विजयावर शंका उपस्थित केली जात होती. भारतीय संघातील पहिल्या फळीतील फलंदाज चमकदार कामगिरी करण्यात कमी पडले. त्यामुळे भारताला संपुर्ण सामन्यात धावासाठी संघर्ष करावा लागला. या सामन्यात भारतासमोर २४० धावांचे लक्ष होते. २२१ धावांतच भारताचा संघ गारद झाला. यात चमकदार कामगिरी केली ती जडेजाने. परंतू त्याच्या झुंजार खेळीचा भारताच्या संघाला उपयोग झाला नाही. या सामन्यात हारल्यानंतर भारत वर्ल्डकप मधून बाहेर पडला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय