विश्वचषक २०१९ : भारताची न्यूझीलंड विरोधात खराब सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषक स्पर्धेला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्याआधी सर्व संघ सर्व सामने खेळत आहेत. संघांची तयारी स्पर्धेआधी चांगली व्हावी यासाठी हे सामने खेळवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सर्व सामना खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. भारताने पहिल्या २० शतकांत ८१ धावा केल्या असून भारताने आपले पाच खेळाडू गमावले आहेत.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने या सामन्यात भेदक मारा करत रोहित (२), शिखर (२) आणि राहुलला (६) स्वस्तात बाद केले. कर्णधार कोहली ग्रँडहोमचा बळी ठरला. कोहलीने अवघ्या १८ धावा केल्या. दरम्यान दुखापतींचाही सामना भारताबरोबरच न्यूझीलंडला देखील करावा लागत आहे. आजच्या सामन्यात भारताचे केदार जाधव आणि विजय शंकर आजच्या सामन्यात खेळणार नाहीत. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टॉम लॅथम याला देखील दुखापतीने गाठले आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

दरम्यान, हि स्पर्धा ३० मे पासून १४ जुलैपर्यंत खेळवली जाणार असून जगातील १० संघ या स्पर्धेत एकमेकांसमोर भिडणार आहेत.