वर्ल्डकप 2019 : पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव

लंडन : वृत्तसंस्था – अद्याप विश्वचषकाचे सामने सुरु व्हायचे आहेत. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. कारण भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. फलंदाजांच्या वाईट कामगिरीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 179 धावा करता आल्या. या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत न्यूझीलंडने भारताला पराभूत केले.

न्यूझीलंडने भारताचे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण करत सहज विजय मिळवला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर या दोघांनी अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. न्यूझीलंडकडून टेलरने सर्वाधिक 71 धावा केल्या, तर विल्यमसनने 67 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

फक्त रवींद्र जडेजाचा अपवाद वगळता  भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही, कारण जडेजाने 50 चेंडूंत 6 चौकार आणि दोन षटकाराच्या जोरावर 54 धावांची खेळी साकारली. जडेजाच्या या खेळीच्या जोरावरच भारताला न्यूझीलंडपुढे 180 धावांचे आव्हान ठेवता आले. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने पहिल्याच सत्रात भारताचे तीन गडी बाद केले त्यामुळे पहिल्या दहा षटकातच  भारताची अवस्था  ३९ धावांवर तीन बाद अशी झाली होती.

वर्ल्डकपच्या सराव सामन्यातच भारतीय संघाची दैना उडालेली पाहायला मिळाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत भारताचा संघ 179 धावांत सर्वबाद केला. भारताच्या एकाच फलंदाजाला तीसपेक्षा जास्त धावा करता आल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 54 धावा केल्या. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चार बळी मिळवले.

https://twitter.com/BCCI/status/1132230190514487296