…तर वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये दोन्ही संघांना ‘विजेता’ घोषित करणार

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तीन आठवडे स्पर्धेतून आराम करणार आहे.

पाऊस हि एक मोठी चिंता सर्वच संघांसाठी ठरत आहे. याआधी देखील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याचबरोबर सोमवारी झालेला विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना देखील रद्द करण्यात आला होता. त्यानंतर काल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला सामना देखील रद्द करण्यात आला. पावसामुळे रद्द होणाऱ्या सामन्यांमुळे सेमीफायनलचे गणित बदलणार आहे. तगड्या संघाना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र या सगळ्यात साखळी सामने जरी रद्द झाले तरी फायनल आणि सेमीफायनलमध्ये असे करता येणार नाही. त्यामुळे सेमीफायनलमध्ये पाऊस पडला तर आयसीसी काय करणार ? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असणार, तर त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

त्यामुळे या सगळ्यात जर सेमीफायनलच्या सामन्यांत पाऊस पडला तर यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर राखीव दिवशी देखील पाऊस पडला तर साखळी सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला फायनलमध्ये प्रवेश दिला जाईल. अशीच परिस्थिती जर फायनलमध्ये उद्भवली तर त्यासाठी देखील राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र दोन्ही दिवशी खेळ होऊ शकला नाही तर फायनलमध्ये दोन्ही संघाना विजेते घोषित केले जाते. अशीच परिस्थिती २००२ मधील चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये झाली होती. त्यावेळी दोन्ही संघाना विजेते घोषित करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेत अशी स्थिती येऊ नये याचीच प्रार्थना पाठीराखे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like