World Cup 2019 : लंकेचा ‘डंका’ ; अफगाणिस्तानवर ३४ धावांनी विजय

कार्डिफ : वृत्तसंस्था – श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात काल खेळवला गेलेल्या वर्ल्डकपमधील सातव्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तनावर ३४ धावांनी  विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३६.५ षटकांत सर्व बाद २०१ धावा केल्या. मात्र सामन्याच्या ३३ व्या षटकात पाऊस सुरुवात झाल्याने सामना ४१ षटकांचा करण्यात आला. अफगाणिस्तानच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे श्रीलंकेचे गोलंदाज ढेपाळले. आणि अवघ्या २०१ धावांत ऑलआऊट झाले. डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानला ४१ षटकांत १८७ धावाचं आव्हान मिळालं.

या सामन्यात श्रीलंकेने पहिली विकेट ९२ धावांवर गमावली. श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथे करुणारत्नेने ३० धावा केल्या. तर कुसल परेराने ७८ धावांची खेळी. मात्र श्रीलंकेचे इतर फलंदाज अफगाणिस्तानच्या माऱ्यासमोर कमकुवत ठरले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने सर्वाधिक चार गडी बाद केले. त्याने ९ ओव्हरमध्ये ३८ धावा देत ४ बळी मिळवले. तर रशीद खानने दोन बळी मिळवले.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. हजरतुल्लाज झाजइने ३०, नजीबुल्लाह झारदनने ४३ धावा केल्या. कर्णधार नैबने ३२ धावा केल्या यांच्या व्यतिरिक्त इतरांना धावा करता आल्या नाहीत. काही अंतरात त्यांचे गाडी बाद होत गेले आणि त्यांचा डाव कोसळला. त्यांचा संपूर्ण संघ १५२ धावाच करू शकला. लंकेकडून नुवान प्रदीपने ४ गडी बाद केले तर मलिंगाने ३ गडी बाद केले. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर काल श्रीलंकेने चांगले कमबॅक करत विजय मिळवला.