ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिका वर्ल्डकपमधून ‘OUT’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मध्ये काल आणखी एका संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. काल खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ गाडी राखून पराभव केला. मात्र या पराभवाबरोबरच दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. केन विल्यमसनच्या नाबाद शतकाच्या बळावर बुधवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

यंदाची विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे. या स्पर्धेत १० संघांनी भाग घेतला आहे. यात सर्व संघाना एकमेकांशी एकूण नऊ सामने खेळायचे असल्याने यावेळी स्पर्धा सर्वच संघासाठी थोडी जड होती. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी हि स्पर्धा फारच अवघड ठरलेली आपल्याला दिसून आले आहे.

दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत सहा सामने खेळले असून सहा सामन्यात चार पराभव आणि ३ गुणांसह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे उरलेल्या तीन सामन्यांत जरी विजय मिळवला तरी स्पर्धेत ते उपांत्य फेरीत जाणार नाहीत. मात्र उरलेल्या सामन्यांत विजय मिळवून ते इतर संघासाठी मार्ग कठीण करू शकतात.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या आगोदर अफगाणिस्तानचे देखील या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अफगाणिस्तानचे देखील पाच सामने झाले असून त्यांना सर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो