वर्ल्डकप २०१९ : हॉटेलमध्ये स्विमींग पुल नसल्याने ‘हा’ संघ ICC वर भडकला

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास तीन  सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी  विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. त्यानंतर  झालेला न्यूझीलंडविरुद्धचा  सामना पावसात  वाया गेला. त्यामुळे सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत वरच्या स्थानावर जाण्याची भारतीय संघाची संधी हुकली.या स्पर्धेत सगळेच संघ प्रत्येक सामना जिंकण्यासासाठी मैदानात उतरत आहे. मात्र पाऊस आपले काम चोख पार पडत आहे. आतापर्यंत पावसामुळे पाच सामने रद्द करावे लागले आहेत.

या सगळ्यात श्रीलंकन संघाने आयसीसीवर भेदभावाचे आरोप केले आहेत. ज्या हॉटेलमध्ये श्रीलंकन संघ उतरला आहे, त्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल नसल्याचा आरोप श्रीलंकन संघाचे मॅनेजर अशांता डिमेल यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे कि’ आयसीसीला चांगलेच माहित आहे कि, खेळाडूंसाठी स्विमिंग पूल किती महत्वाचं आहे. त्याचबरोबर खेळपट्टीमध्ये देखील भेदभाव केल्याचा आरोप त्यांनी केलं आहे. आतपर्यंत आम्ही खेळलेल्या चारपैकी  दोन सामन्यांत आम्हाला खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्या सामन्यात जास्त जास्त धावा निघू नाही शकल्या. मात्र त्यानंतर त्याच मैदानावर दुसरे संघ खेळले असता त्यांना कमी गवत असणारी खेळपट्टी देण्यात आली.

दरम्यान,या संदर्भात आयसीसीने स्पष्टीकरण देताना या आरोपांना नाकारत अशा प्रकारे कोणत्याही संघावर भेदभाव केला जात नसून सर्वांना समान व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले. आज श्रीलंकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत असून श्रीलंकेने आतापर्यंत चार सामने खेळले असून एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला असून त्यांचे सध्या चार गुण आहेत.

आरोग्याविषयक वृत्त

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

‘इन्सेफेलाईटीस’चे थैमान, बिहारमध्ये ६६ मुलांचा मृत्यू

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका