ICC World Cup 2019 : सेमीफायनलच्या आधी ‘या’ संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हे’ दोन खेळाडू बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया ११ जुलै रोजी इंग्लंडबरोबर सेमीफायनल खेळणार असून त्याआधीच त्यांचे दोन खेळाडू जखमी होऊन वर्ल्डकपच्या बाहेर पडले आहेत. उस्मान ख्वाजा आणि मार्कस स्टॉयनिस हे दोन खेळाडू जखमी झाले असून उस्मान ख्वाजा या स्पर्धेतून बाहेर पडला असून त्यांच्या जागी मॅथ्यू वेड आणि मिशेल मार्श यांना संधी देण्यात आली आहे.

प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले कि, उस्मान ख्वाजा हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून मार्कस स्टॉयनिस हा जखमी झाला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या जागी बदली खेळाडू घेतले आहेत.

शनिवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात उस्मान ख्वाजा हा जखमी झाल्याने त्याला संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागणार आहे. तर मार्कस स्टॉयनिस हा स्पर्धेच्या मध्येच जखमी झाल्याने तो दोन सामने खेळू शकला नव्हता, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात तो पुन्हा जखमी झाल्याने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलमध्ये त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र हे दोघे जखमी झाले असले तरी ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर यामुळे काही फरक पडणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सेमीफायनलमधील चार संघांचे प्रवेश निश्चित झाले असून उद्या ९ जुलै रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होत असून ११ जुलै रोजी इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना होणार आहे. त्याचबरोबर १४ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात या चार संघांपैकी कोण भिडणार याकडे देखील क्रीडा रसिकांचे लक्ष लागून आहे.

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

Loading...
You might also like