World Cup 2019: ‘या’ खेळाडूंचे वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा केली. के. एल. राहुल आणि दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. तर विकेटकीपर आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंतची भारतीय संघात वर्णी लागू शकली नाही. दिनेश कार्तीकने अनेक महत्त्वाच्या सामन्यात विकेटकीपरची जबाबदारी योग्य पद्नधतीने सांभाळली. त्याच्याकडे अनुभव आहे त्यामुळे त्याची निवड करण्यात आली असल्याचे बीसीसीआय चे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले.

आज घोषीत करण्यात आली. यामध्ये अंबाती रायुडू आणि ऋषभ पंतला डच्चू देण्यात आला. अंबाती रायडूकडे टीम इंडियाच्या बॅटिंग क्रमवारीला चौख्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून पाहिले जात होते. मागच्या वर्षभरात रायुडुला चौथ्या क्रमांकावरच खेळण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, न्युझीलंड दौऱ्यानंतर अंबाती रायुडुचा फॉर्म ढासळला, यामुळे त्याला वर्ल्ड कपला मुकावे लागले.
वर्ल्ड कपमध्ये दुसरा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतच्या नावाचीही चर्चा होती. पण निवड समितीने युवा पंत ऐवजी अनुभवी दिनेश कार्तीकची निवड केली. २१ वर्षाच्या ऋषभ पंतला आत्तापर्यंत खेळलेल्या ५ वनडे मॅचमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. या ५ वनडेमध्ये पंतने फक्त ९३ धावा केल्या आहेत. यामध्ये पंतचा सर्वाधिक स्कोअर ३६ आहे.

अनुभव आणि वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तणावाच्या क्षणी शांत आणि संयमी राहण्याच्या खुबीमुळे दिनेश कार्तिक हा ऋषभ पंतपेक्षा उजवा ठरला. ऋषभ पंतकडे एक्स-फॅक्टर आहे, तसंच आपल्या आक्रमक खेळीमुळे पंत एकहाती मॅच फिरवू शकतो, पण पंतसारख्या युवा खेळाडूला एवढ्या मोठ्या स्पर्धेत उतरवण्यापेक्षा अनुभवी दिनेश कार्तिकला निवड समिती आणि विराट कोहलीने प्राधान्य दिल्याचं बोललं जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us