वर्ल्डकप २०१९ : ‘बांगला’चे वाघच ‘सरस’, ‘पाक’ला टोमणे मारत फॅन्स म्हणाले, ‘बेटा भले निकम्मा सही.. पोता होनहार है’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८९ धावांनी मात करत विक्रमी ७ वेळा या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर काल झालेल्या सामन्यात जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशने तगड्या वेस्टइंडीजवर मात करत या स्पर्धेत सगळ्याच संघाना धक्का दिला.
World Cup

सात विकेटने विजय मिळवत बांगलादेशने आपले या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. त्यानंतर सोशल मीडियावर या संबंधात मोठ्या प्रमाणात ट्विट तसेच कमेंट्स व्हायरल झाल्या आहेत. बांग्लादेशच्या या विजयाची पाकिस्तानच्या पराभवाशी तुलना करत नेटिझन्सनी पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावर टर उडवली. काहींनी ‘मुलगा नालायक, पण नातू मात्र हुशार’ असं म्हणत पाकिस्तानला टोमणे मारले. तर काहींनी मुलगा कितीही नालायक असला तरी नातू मात्र हुशार असतो असे म्हटले आहे.
World Cup

‘फादर्स डे’च्या दिवशी हा सामना रंगल्याने क्रिकेट रसिकांनी याला ‘बाप विरुद्ध बेटा’ असा रंग दिला होता. भारत आणि पाकिस्तान मॅचसाठीही अनेक ‘बाप-बेटे’ उल्लेख असलेल्या जाहिरातीही टीव्ही स्क्रीनवर धडाधड आदळत होत्या. मग त्याचं उधाण आपसूकच सोशल मीडियावरही दिसून आलं. त्यानंतर काल झालेल्या पराभवानंतर या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानपेक्षा बांगलादेशचा संघ आशियात सर्वोत्तम असल्याचे एका युझरने म्हटले आहे.
World Cup

दरम्यान, काही जणांनी बांगलादेशचे कौतुक करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बांगलादेश आज या स्थानावर पोहोचला असल्याचे म्हटले आहे.